मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivajiraje Bhosale Passed Away : श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पुण्यात निधन

Shivajiraje Bhosale Passed Away : श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पुण्यात निधन

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 13, 2022 08:14 PM IST

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (Shivajiraje Bhosale)यांचेवयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे.पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये उपचारादरम्यानत्यांनी अखरेचा श्वास घेतला.

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (Shivajiraje Bhosale) यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये  उपचारादरम्यान त्यांनी अखरेचा श्वास घेतला. शिवाजीराजे भोसले हे दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांचे भाऊ तर खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे काका होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. 

उद्या (बुधवार) सकाळी ९ वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता अदालतवाड्यापासून अंत्ययात्रा निघणार आहे. संगम माहूली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म २३ एप्रिल १९४७ रोजी झाला होता. सातारा शहराच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांनी सलग सहा वर्षे सातारा नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली. १९८५ ते १९९१ या कालावधीत ते साताऱ्याचे नगराध्यक्ष होते. 

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे साताऱ्यातील अदालत वाडा येथे वास्तव्य होते. ते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ ट्रस्टचे विश्वस्त होते. त्याचबरोबर ते महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. परळी खोऱ्यातील आरे गावच्या भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. त्या माध्यमातून शिवतेज माध्यमिक विद्यालय आरे या संस्थेची उभारणी केली. करंजे येथील सेवाधाम अग्नि मंदिर संस्थेचे ते कार्याध्यक्ष होते. 

WhatsApp channel

विभाग