लेकरं रडत होती अन् शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाकडून कारचालकाला भररस्त्यात बेदम मारहाण, पाहा VIDEO-ubt posted video of shinde mla security guard brutally beating to car driver mla throve repailed on video ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लेकरं रडत होती अन् शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाकडून कारचालकाला भररस्त्यात बेदम मारहाण, पाहा VIDEO

लेकरं रडत होती अन् शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाकडून कारचालकाला भररस्त्यात बेदम मारहाण, पाहा VIDEO

Sep 11, 2024 10:15 PM IST

Shivsena UBT On Shinde Group : ठाकरे गटाने व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की, महाराष्ट्रात गुंडाराज! शिंदेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडी गार्डने नेरळ येथे भरदिवसा, भररस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली.

आमदाराच्या सुरक्षारक्षकाकडून कारचालकाला भररस्त्यात बेदम चोप
आमदाराच्या सुरक्षारक्षकाकडून कारचालकाला भररस्त्यात बेदम चोप

UBT Shivsena on Mahendra Thorve : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडत आहेत. राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू आहे. त्यातच उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षा रक्षकाने भररस्त्यावर एका कार चालकाला लोखंडी पाइपाने मारहाण केल्याचा व्हिडीओ ठाकरे गटाने पोस्ट केला आहे.

शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षा रक्षकाने एका कार चालकाला रॉडने मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. यावेळी गाडीत असलेली लहान मुले व महिला रडत होत्या मात्र सुरक्षा रक्षकाने भररस्त्यात कारचालकाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाने एक्सवर पोस्ट केला आहे. नेरळमधील भररस्त्यात आमदाराच्या बॉडीगार्डने मारहाण केल्याचे त्यात दिसत आहे. सरकारवर टीका करत ठाकरे गटाने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलेत.

शिवसेनेने पोस्ट केलेल्या हा व्हिडिओ नेरळमधील रस्त्यावरील असल्याचे सांगितलं जात आहे. "मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच!",असा आशय लिहित ठाकरे गटाने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक तरुण कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला दांडक्याने बेदम मारहाण करत आहे.

दरम्यान या व्हिडिओवरून ठाकरे गटाने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे. शिवा असं महेंद्र थोरवेंच्या बॉडीगार्डचं नाव असून त्याने भररस्त्यात एका कारचालकाला मारल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाकरे गटाने व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की, महाराष्ट्रात गुंडाराज!  मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या' शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भरदिवसा, भररस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही... कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये! कायदा  सुव्यवस्थेची वाट लागलीये!  कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय!

मार खाणारा माझा नातेवाईक – आमदार थोरवे

दरम्यान या घटनेवर आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. त्या घटनेशी आमचा कोणताही संबंध नाही. तो माझा सुरक्षारक्षक नाही. सोशल मीडिया  आणि टीव्हीवर आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचं सांगितलं जात आहे. पण तो माझा बॉडीगार्ड नाही. पण दोन्ही कार्यकर्ते हे आमचे आहेत. ज्याला मारहाण झाली तो माझा नातेवाईक आहे. ठाकरे  गटाकडून  मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप आमदार थोरवे यांनी केला आहे.

Whats_app_banner