सुषमा अंधारे यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात दणकेबाज भाषण करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. सुषमा अंधारे म्हणाल्या की, सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात की, द्वेष संपला पाहिजे. सांप्रदायिक विभाजन होता कामा नये. दुर्बल घटकांना सोबत घेऊन देश मजबूत झाला पाहिजे. सरसंघसंचालकजी तुमचं म्हणणं सर आँखोपर. पण तुम्ही हे सांगताय कुणाला? असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला. आधी देवेंद्र फडणवीस यांचे कान उपटा. त्यांना सांगा. महाराष्ट्र शांत हवा आहे. इथे संप्रादायिक विभाजन करू नका, त्यांनी जातीत जात ठेवली नाही, अशा शब्दात सुषमा अंधारेंनी टीका केली.
फडणवीसांनी राज्यात माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी फडवीसांना सल्ला द्यावा, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
आज अठरा पगड जाती दसरा साजरा करत आहेत. आधीपासून येथील विविध जातीचे लोकं गुण्या गोविंदाने नांदतात. द्वेष बुद्धी संपवण्याचंच असेल तर सरसंघचालकांनी हा सल्ला देवेंद्र फडणवीस यांना द्यावा. कोकणात न चालणारी चिल्लर, बाजारातून रद्दबादल झालेले, असे चारआणे बार आणे चिल्लर तुम्ही आणत आहात. तर देवेंद्र फडणवीस यांचे कान उपटा. त्यांना सांगा. महाराष्ट्र शांत हवा आहे. इथे संप्रादायिक विभाजन करू नका. आधी चार आणे बार आणे चिल्लर मुस्लिम द्वेष करत होती. आम्ही हिंदूंचं तसेच मुस्लिमांचे अभिनंदन करते, त्यांनी कमालीचा संयम दाखवला. त्यांनी कवडीची किंमत दाखवली नाही. आता त्यांनी दुसरा खेळ सुरू केला आहे. हिंदू मुस्लिम कार्ड चालत नाही म्हणून मराठा आणि ओबीसीचं कार्ड खेळलं जात आहे. राज्यातील गावा-गावात द्वेषाचं बीज पेरलं जात आहे.
महिलांनी योजनेचे पैसे द्यावे. दीड हजार रुपये आम्हाला फडणवीसांनी नागपूरचा बंगला विकून दिले नाही. किंवा मुख्यमंत्र्यांनी आपली जमीन विकून पैसे दिले नाहीत. आमचेच पैसे आहेत, आमच्या कराचे पैसे आहेत, त्याचे क्रेडिट घेऊ नका. राज्यातील जनतेच्या टॅक्समधून मिळालेल्या पैशाचे क्रेडीट घेऊ नका, तुम्हा फक्त पोस्टमन आहात. गावागावातील अनेक भावांनी बहिणींच्या लग्नासाठी जमिनी विकल्या, मात्र कधी बहिणीला पैसे दिले म्हणून बॅनर लावलेत का? लग्नाच्या रुकवताच्या बाजुला कधी पोस्टर लावलेले पाहिले आहे का?
आपल्याला नात्यांची किंमत कळते. यांना बहिणीचे नाते कळत नाही. बाईपणावर हल्ले करता, हे संस्कार बाळासाहेबांचे असू शकत नाही ना ते आनंद दिघेंचे आहेत असेही अंधारे म्हणाल्या. तुमचे हे संस्कार रेशीमबागेतील आरएसएसच्या बाटगेंचे असू शकतात. न्याय तुम्ही अत्याचार झालेल्या महिलेला देऊ शकत नाही असेही अंधारे म्हणाल्या.
संबंधित बातम्या