दात निघालेला, नखं काढलेला आणि नुसता तोंडानं हवा मारणारा वाघ; किशोरी पेडणेकर यांची राज ठाकरे यांच्यावर टीका
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दात निघालेला, नखं काढलेला आणि नुसता तोंडानं हवा मारणारा वाघ; किशोरी पेडणेकर यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

दात निघालेला, नखं काढलेला आणि नुसता तोंडानं हवा मारणारा वाघ; किशोरी पेडणेकर यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

Apr 13, 2024 07:08 PM IST

Kishori Pednekar criticizes MNS Cheif Raj Thackeray: ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

 किशोरी पेडणेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
किशोरी पेडणेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

Lok Sabha Election 2024: मनसेच्या पाडव्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा दर्शवत लोकसभा निवडणूक नसल्याचे जाहीर केले. राज ठाकरेंच्या भूमिकेवरून त्यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागली. राज ठाकरे हे भाजपच्या दबावाखाली झुकले, असा प्रचार महाविकास आघाडीतील नेते करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंवर सडकून टिका केली. राज ठाकरे शक्तीहीन झालेला वाघ आहे. लोकांना दात निघालेला, नखं काढलेला आणि नुसता तोंडाने हवा मारणारा वाघ नकोय, असे किशोरी पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Jitendra Awhad On PM Modi: अब नही जायेंगे, २०० पार; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

"महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंना पत्रकार परिषद घेण्याची गरज काय होती? इतर पक्ष निवडून आल्यानंतर आपली भूमिका बदलतात, मग मी का बदलू नये, असे राज ठाकरे म्हणतात. पण राज ठाकरेंचा पक्ष स्थापन झाल्यापासून सातत्याने भूमिका बदलत आहे. २०१९ च्या निवडणुकीत राज ठाकरेंची 'लाव रे तो व्हीडिओ' ही टॅगलाईन लोकप्रिय झाली. पण त्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेत बदल केला. एवढेच नव्हेतर अनेकवेळा त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलला. आधी निळा, मग हिरवा त्यानंतर थोडासा भगवा असे करत राज ठाकरेंनी अनेकदा झेंडे बदलले. यामुळे असा दात निघालेला, नखं काढलेला आणि नुसता तोंडाने हवा मारणारा वाघ लोकांना नकोय, असे किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

Maharashtra rain : राज्यात अवकाळीचे २ बळी, वीज अंगावर पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू, गारपिटीने फळबागांचे नुकसान

राज ठाकरेंच्या निर्णयावर मनसे नेते नाराज

मनसेच्या पाडव्या मेळाव्यापूर्वी राज ठाकरे नेमके कोणत्या विषयावर बोलणार आणि त्यांची भूमिका काय असेल, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. परंतु, पाडव्या मेळाव्यात त्यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दर्शवत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज ठाकरेंचा हा निर्णय काही मनसे नेत्यांना पटलेला नाही. काही ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे.

म्हणून नरेंद्र मोदींना एक संधी दिली- राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दित महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यात त्यांना यश मिळाले. नरेंद्र मोदींमुळे राम मंदिर झाले. मोदींच्या धोरणामुळे त्यांना आणखी पाच वर्षे संधी देण्यात यावी, असे राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर