मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Accident : भरधाव वेगातील दुचाकींची धडक; दोन तरुण जागीच ठार; नाशिकच्या बारागाव पिंप्री- सिन्नरमार्गावरील घटना
नाशिक अपघात
नाशिक अपघात

Nashik Accident : भरधाव वेगातील दुचाकींची धडक; दोन तरुण जागीच ठार; नाशिकच्या बारागाव पिंप्री- सिन्नरमार्गावरील घटना

06 October 2022, 16:47 ISTNinad Vijayrao Deshmukh

Nashik Accident : नाशिक येथे बारागाव पिंप्री- सिन्नर मार्गावर सुळेवाडी फाट्याजवळ दोन दुचकींची धडक होऊन झालेल्या अपघात दोन तरुण जागीच ठार झाले.

Nashik Accident : नाशिक येथे एन दसऱ्याच्या दिवशी एक दुखद घटना घडली आहे. बारागाव पिंप्री- सिन्नर मार्गावर सुळेवाडी फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या दोन दुचाकींची समोरा समोर धडक झाल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

अनिकेत बबन दिघे व सोमनाथ मधुकर असे या अपघात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. अनिकेत त्याच्या दुचकीवरून बीजी बारागाव पिंपरी होऊन सिन्नरला येत होता. तो आईला विंचूरला सोडून पुन्हा माघारी येत होता. तर सोमनाथ आपल्या मोटरसायकलने घोटी येथील नांदगाव कडे जात होता. सिन्नर ते बारागाव पिंपरी दरम्यान सुळेवाडी फाटा जवळ या दोन्ही दुचाकी एकमेकांवर धडकल्या. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकिंचा चक्काचूर झाला.

अपघात दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दोघेही जागेवर पडून होते. बऱ्याच अवधी नंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यांनंतर रुग्णवाहिक ही घटनास्थळी आली. त्या नंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी एमआरयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून शिपाई विलास जाधव पुढील तपास करीत आहेत.

विभाग