देव तारी त्याला..! इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून चिमुकला पडला अन् चमत्कार घडला, CCTV फुटेज तुफान व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  देव तारी त्याला..! इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून चिमुकला पडला अन् चमत्कार घडला, CCTV फुटेज तुफान व्हायरल

देव तारी त्याला..! इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून चिमुकला पडला अन् चमत्कार घडला, CCTV फुटेज तुफान व्हायरल

Jan 26, 2025 09:15 PM IST

Dombivli News : डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरामध्ये एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन वर्षाचा मुलगा खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र देवदूत म्हणून धावत आलेल्या एका तरुणाच्या प्रसंगावधानाने मुलाचा जीव वाचला आहे.

तिसऱ्या मजल्यावरून चिमुकला पडला अन् चमत्कार घडला
तिसऱ्या मजल्यावरून चिमुकला पडला अन् चमत्कार घडला

आपल्या आजुबाजुला अनेक दैवी चत्मकाराच्या घटना घडल्याचे दिसून येतात. डोंबिवलीतील देवीचापाडा परिसरात एक थरारक घटना घडल्याचे समोर आले आहे. यात इमारतीच्यातिसऱ्या मजल्यावरून २ वर्षांचा चिमुरडा खाली पडल्याची घटना घडली. चिमुकला खाली पडताच सर्वांनी श्वास रोखून धरले होते. मात्र चिमुरडा खाली पडत असल्याचे दिसताच या इमारतीत राहणाऱ्या एका तरुणाने त्याला अलगद झेलत त्याचा जीव वाचवला. भावेश म्हात्रे असे या धाडसी तरुणाचे नाव आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भावेशने त्याने जीवाची पर्वा न करता चिमुरड्याला वाचवण्यासाठी झेप घेतली. दरम्यान हा चिमुरडा त्याच्या हातावर आला आणि नंतर तो पायावर पडला. या घटनेत चिमुकला किरकोळ जखमी झाला असला तरी त्याचा जीव वाचला आहे.

सात्विक राहुल देसले असे या चिमूरड्याचे नाव आहे. इमारतीच्यातिसऱ्या मजल्यावरील घरात रंगकाम सुरू होते. खिडक्यांच्या काचा खराब होऊ नयेत यासाठी त्यांनी काचा काढून ठेवल्या होत्या. याच उघड्या ग्रीलच्या गॅपमधून गॅलरीत खेळणारा दोन वर्षाचा चिमुरडा खाली पडला. डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा परिसरात राहणारा भावेश म्हात्रे हा ३५ वर्षीय युवक इमारत बांधकाम करण्याचे तसेच घराच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. शनिवारी (२५ जानेवारी)भावेश इमारतीत घर पाहण्यासाठी आलेल्या ग्राहकांना घर दाखवून खाली उतरत होता. त्यावेळी त्याला १३ मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून बाळ खाली पडत असल्याचे दिसले. त्याने क्षणाचाही विलंब न लावता बाळाकडे धाव घेतली व त्याला चेंडूप्रमाणे अलगद झेलण्याचा प्रयत्न केला.

मात्र खूप उंचीवरून पडल्याने बाळ त्याच्या हातातून सटकले. तरीही प्रसंगावधान राखत त्याने पाय पुढे करत बाळाला पायावर झेलले. बाळ आधी त्याच्या हातावर व नंतर पायावर आदळल्याने थेट जमिनीवर पडण्यापासून रोखले गेले. यामुळे त्याचा जीव वाचला आहे. आजूबाजूच्या नागरिकांसह आई-वडिलांनी तातडीने मुलाला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी बाळ सुखरूप असल्याचे सांगताच आई-वडिलांसह परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

ग्राहकांना घर दाखवून इमारतीमधून बाहेर पडलेला भावेश मागे वळून ग्राहकांशी बोलत असतानाच त्याला खाली पडणारा चिमुरडा दिसला. त्याच्या प्रसंगावधानाने बाळाचा जीव वाचला आहे. या घटनेत बाळाचा हात फॅक्चर झालाय. सध्या या बाळाची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती बाळाच्या नातेवाईकांनी दिली आहे.इमारतीच्या सीसीटीव्हीत या घटनेचा थरार कैद झाला असून याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 

मुलासाठी देवदूत बनलेल्याभावेशने सांगितले की, तो क्रिकेट खेळतो. त्याने भिवंडी कल्याण, डोंबिवली,मुंबई, ठाणे व रायगड परिसरामध्ये क्रिकेटच्या अनेकटूर्नामेंटमध्ये सहभाग घेऊन पारितोषिके मिळवली आहेत. क्रिकेटमध्ये झेल घेण्याचा सराव त्याला बाळाला वाचवताना कामी आला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर