पुण्यात ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना थांबेना! बारामती भिगवण मार्गावर दारू पिऊन गाडी चालवल्याने दोन विद्यार्थी ठार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना थांबेना! बारामती भिगवण मार्गावर दारू पिऊन गाडी चालवल्याने दोन विद्यार्थी ठार

पुण्यात ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना थांबेना! बारामती भिगवण मार्गावर दारू पिऊन गाडी चालवल्याने दोन विद्यार्थी ठार

Dec 09, 2024 01:35 PM IST

Pune Baramati Bhigwan road Accident : पुण्यात बारामती भिगवण मार्गावर दारू पिऊन कार चालवण्याने रेड बर्ड कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना थांबेना! बारामती भिगवन मार्गावर दारू पिऊन गाडी चालवल्याने दोन विद्यार्थी ठार
पुण्यात ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना थांबेना! बारामती भिगवन मार्गावर दारू पिऊन गाडी चालवल्याने दोन विद्यार्थी ठार

Pune Baramati Bhigwan road Accident : पुण्यात ड्रंक अँड ड्राइवच्या घटना वाढत चालल्या आहेत. बारामती-भिगवण मार्गावर दारू पिऊन कार चालवल्याने झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हे विद्यार्थी रेड बर्ड कॉलेजचे असून ते रविवारी रात्री उशिरा दारू पिऊन गाडी चालवत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्षू शर्मा (वय २१, रा. दिल्ली), आदित्य कणसे (वय २१) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृत विद्यार्थ्यांची नावे आहे. तर बिहारमधील कृष्णा इशू सिंग (वय २१) हा वाहन चालवत होता. तो या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. तर राजस्थानमधील चेष्टा बिश्नोई (वय २१) हा विद्यार्थी देखील या अपघातात जखमी झाला आहे. तर आणखी एका जखमीचे नाव समजू शकले नाही. ही घटना बारामती-भिगवण रोडवर जैनिकवाडी गावाजवळ पहाटे ३.१५ वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार रेड बर्ड कॉलेजचे विद्यार्थी हे रात्री दारू पिऊन त्यांच्या टाटा हॅरियर एसयूव्ही (नोंदणी क्रमांक BR-03AM-9993) भरधाव वेगात गाडीने जात होते. दारू पिऊन ते फिरण्याच्या उद्देशाने बाहेर पडले होते. मात्र, त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघात एवढा भीषण होता की, दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर बाकीचे हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.

पुण्यात ड्रंक अँड ड्राइवच्या घटनेत वाढ

पुण्यात दारू पिऊन कार चालवून अपघाताच्या घटना या वाढल्या आहेत. गेल्या १९ मे रोजी दारू पिऊन आलीशान पोर्शे कार चालवून बड्या बिल्डर पुत्राने दोन अभियंत्यांना उडवले होते. या घटनेत एका तरुणाचा व तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे अवघ्या देशात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर अनेक घटना पुण्यात घडल्या. पिंपरी चिंचवड येथे देखील काही तरुणांनी दारूच्या नशेत ऑडी कार चालवून एका तरुणांला तब्बल ३ किमी पर्यंत फरफटत नेले होते. या घटना वाढत असतांना देखील पोलिस प्रशासन मात्र, अशा दारुड्या वाहनचालकांवर कारवाई करतांना दिसत नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर