मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Guhagar Bus Accident : एसटी बस समोरासमोर धडकल्या; भीषण अपघातात ३० प्रवासी जखमी
ST Bus Accident In Guhagar Ratnagiri
ST Bus Accident In Guhagar Ratnagiri (HT)

Guhagar Bus Accident : एसटी बस समोरासमोर धडकल्या; भीषण अपघातात ३० प्रवासी जखमी

12 September 2022, 12:06 ISTAtik Sikandar Shaikh

ST Bus Accident In Guhagar : दोन एसटी बस समोरासमोर धडकून अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघातात दोन्ही बसचं मोठं नुकसान झालं आहे.

ST Bus Accident In Guhagar Ratnagiri : कोकणातील गुहागरमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसेसमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन्ही एसटी बसचं मोठं नुकसान झालेलं आहे. यात कोणतीही जिवीतहानी झालेली नसून ३० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांमध्ये महिला आणि शाळकरी मुलांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण-धोपावे बस आणि गुहागर डेपोची बस एका धोकादायक वळणावर समोरासमोर धडकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस होत असल्यानं अनेक ठिकाणी रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळंच हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वळणावरून येणाऱ्या बसचा अंदाज दुसऱ्या बसचालकाला न आल्यामुळं दोन्ही बसेसच्या समोरासमोर अपघात झाला.

यावेळी प्रवाशांनी आरडाओरड करताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय गुहागर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रस्त्याच्या वळणावर झालेला हा अपघात इतका भीषण होता की, त्यात दोन्ही बसच्या समोरतचा भाग चक्काचूर झाला आहे. बसमध्ये शाळकरी मुलांची संख्या जास्त असल्यानं जखमी विद्यार्थ्यांना RGPPL रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान गेल्या ४८ तासांपासून कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं अनेक नद्या-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळं आता प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.