two school children died after drown in wagholi mine : पुण्यात पानशेत येथे धरणाच्या पाण्यात बुडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. वाघोली येथील खाणीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली.
अली अहमद शेख (वय १२), कार्तिक दशरथ दुखरे (वय १२, दोघे रा. शिवरकर वस्ती, वाघोली) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या महितनुसार वाघोलीतील खाणीत पोहण्यासाठी ही मुळे सोमवारी दुपारी गेली होती. यावेळी अली, कार्तिक आणि त्यांचे मित्र पोहायला पाण्यात उतरले. अली आणि कार्तिक यांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते दोघेही बुडाले, दरम्यान ही बाब त्यांच्या मित्रांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसेच काहीनी स्थानिक नागरिकांना याची माहिती दिली. पोलिस आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला ही माहिती कळविण्यात आली.
अग्निशमन दलाचे अधिकारी विजय महाजन, अल्ताफ पटेल,ओंकार पाटील, विकास पालवे, महेश पाटील, मयूर गोसावी, प्रशांत चव्हाण, उमेश फाळके, सुरज इंगवले, प्रकाश मदने यांनी खाणीतील पाण्यात शोधमोहीम राबविली. काही वेळानंतर जवानांनी दोघांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना दवाखान्यात दाखल केले असता, उपचारांपूर्वीच अली आणि कार्तिक यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेमुळे दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
पुण्याच्या पानशेत धरण परिसरात देखील रविवारी फिरण्यासाठी गेलेल्या दोन बहीणींचा सेल्फी घेतांना पाय घसरून पाण्यात पडल्या. यावेळी दोन बहिणींना वाचवण्यासाठी भावाने कोणताही विचार न धरणात तरुणाने उडी मारली. त्याने बहीणींना वाचवले. मात्र, त्याचा बुडून मृत्यू झाला. ज्ञानेश्वर बालाजी मनाळे (वय १८, रा. खराडी) असे धरणात बुडून मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
संबंधित बातम्या