Mumbai Airport Runways will close for Indian Air Force Aerial Display : भारतीय हवाई दलातर्फे मुंबईत १२ ते १४ दरम्यान, हवाई कसरतींचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसांत हवाई दलाची सूर्यकिरण टीम आणि सारंग टीम विविध हवाई कसरतींचे सादरीकरण करणार आहे. दरम्यान, या कारणांसाठी मुंबई विमानताळची धावपट्टी क्रमांक २ ही दुपारी १२ ते १ दरम्यान, बंद ठेवली जाणार आहे. या वरील सर्व उड्डाणे ही या काळात रद्द करण्यात आली आहे.
भारतीय हवाई दलातर्फे मुंबई येथे एरियल डिस्प्ले आयोजित करण्यात आला आहे. या साठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे पुढील दोन दिवस १२ ते १ दरम्यान, बंद राहणार आहे. यामुळे प्रवाशांनी विमानांचे वेळापत्रक तपासून विमातळावर यावे असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय वायुसेनेने मुंबईत हवाई कसरतीचे आयोजन केले आहे. या साठी सूर्यकिरण आणि सारंग टीम ही मुंबईला पोहचली आहे.
या दरम्यान, विमानांचे उड्डाने सुव्यवस्थित करण्यासाठी एअरमेनला नोटीस (NOTAM) जारी करण्यात आला आहे. विमानतळ प्रशासानणे प्रवाशांना विनंती करत या ३ दिवसांत विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या नियोजित फ्लाइट्सची त्यांच्या संबंधित एअरलाइन्सकडे तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.
या कालावधीत कोणतीही उड्डाणे मुंबईत उतरणार नाहीत किंवा टेक ऑफ करणार नाहीत. तर १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर उड्डाणे मुंबईच्या हवाई क्षेत्रातून उडण्यास परवानगी राहणार आहे. भारतातील सर्वात व्यस्त हेलिपॅड असलेल्या जुहू विमानतळावरून कोणतेही विमान उड्डाण होणार नाही कारण या दरम्यान, हेलिकॉप्टर ऑफशोअर ऑपरेशनमध्ये गुंतले राहणार आहेत. विमानतळ प्राधिकरण, CSMIA ने त्यांच्या ट्विटर हँडल वरुन या बाबत माहिती दिली आहे. त्यामुळे जर १२ , १३ किंवा १४ जानेवारीला मुंबईहून विमानाने प्रवास करण्याची योजना आखत असाल, तर विमान उड्डाणाची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या