मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई! दोन पोलिसांचं निलंबन, एफसी रोडवरील बार सील

पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई! दोन पोलिसांचं निलंबन, एफसी रोडवरील बार सील

Jun 24, 2024 09:06 AM IST

Drugs News : पुण्यातील एफसी रोडवरील एका मोठ्या हॉटेल आणि बारमध्ये शनिवारी रात्री जोरदार पार्टी सुरू होती. या पार्टीत तरुणांनी धिंगाणा घालत हॉटेलमध्ये ड्रग्ज करतांनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी हॉटेलवर कारवाई केली आहे.

पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई! आयुक्तांनी केले दोन पोलिसांचं निलंबन, एफसी रोडवरील बार सील
पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई! आयुक्तांनी केले दोन पोलिसांचं निलंबन, एफसी रोडवरील बार सील

Pune FC road hotel Drugs case : पुण्यातील पोर्शे प्रकरणानंतर पुण्यातील नाईट लाईफवर पुणे पोलिसांनी धडक कारवाई केली होती. मात्र, ही कारवाई फार्स ठरली आहे. शनिवारी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील एका बड्या हॉटेलमध्ये डिजेच्या तालावर थीरकत काही तरुणांचा ड्रग्स घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी धडक कारवाई करत हे हॉटेल सील केले आहे. तर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

बीट मार्शल यांच्यावर कारवाई करत त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कामात हालगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी हॉटेलमालकासह पाच जणांना अटक करण्यात आली असून हे हॉटेल सील करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील लिक्वीड लिजर लाउंजमध्ये घडलेला हा प्रकार उघडकीस आल्यावर उत्पादन शुल्क विभागाला व पोलिसांना जाग आली. संध्याकाळी या हॉटेलवर धडक कारवाई करत हॉटेलमधील पाच जणांना उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे. हॉटेलमधील ज्या ठिकाणी परवानगी नव्हती, तिथे सुद्धा अवैधरित्या मद्य साठा ठेवण्यात आला होता, त्याठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत तो साठा जप्त केला आहे. हॉटेलमधील एका मजल्यावर ठेवण्यात आलेला मद्याचा साठा देखील उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.

पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल व पबमध्ये तरुण-तरुणी मनोरंजनासाठी येत असतात. मात्र, या ठिकाणी तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचे या हॉटेलमधील व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे. यात या हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये, चक्क हॉटेलमधील वॉश रुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्स असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रक्ररण आणि ललीत पाटील ड्रग्स प्रकरण अजून शांत झाले नसतांना ही घटना उघडकीस आल्याने पुण्यतिल हॉटेल आणि पब धारकांना अभय कुणाचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पोलिसांनी सील केला बार; काहींना अटक, दोन पोलिस निलंबित

पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री पुण्यातील एफसी रोडवर असलेल्या एल ३ बार नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळेपर्यंत सुरू ठेवण्यात आला होता. २ मालकांनी हा बार पुढे ३ जणांना चालवायला दिला होता. या हॉटेलमध्ये एका इव्हेंटसाठी ४० ते ५० लोकांना तिथे पार्टी करण्याची परवानगी हॉटेल मालकांना विचारली होती. हॉटेल रात्री १.३० बंद करणे अपेक्षित असतांना बारचे मुख्य प्रवेश द्वार बंद करण्यात आले. तर दुसऱ्या दरवाज्याने येणाऱ्या जणाऱ्यांना प्रवेश देण्यात येत होता. सध्या हा बार सील करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओत जी मुळे ड्रग्स सेवन करतांना दिसत आहे. ते कोणते ड्रग्स आहे याचा पोलिस शोध घेत आहेत. असेच हे ड्रग्स कुणी पुरवले याचा देखील पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

WhatsApp channel
विभाग