पवई परिसरातील तीन फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या नीट च्या विद्यार्थ्यासह दोन अल्पवयीन मुलांना पार्क साईट पोलिसांनी अटक केली आहे. पार्क साइट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष घाटेकर यांनी सांगितले की, 'आरोपी 'मनी हायस्ट' या क्राइम ड्रामा मालिकेपासून प्रेरित होते, ज्यात प्रोफेसर म्हणून ओळखला जाणारा एक गूढ माणूस स्पेनच्या रॉयल मिंटमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांच्या गटाची भरती करतो मोठी चोरी करतो. या मालिकेतून प्रेरणा घेऊन आरोपींनी हे गुन्हे केले.
पोलिसांच्या चौकशीत एक आरोपी १७ वर्षांचा असून तो बारावीत शिकत असून वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय प्रवेश-सह-पात्रता (नीट) परीक्षेची तयारी करीत असल्याचे समोर आले आहे. एसएससीपरीक्षेत त्याला ९३ टक्के गुण मिळाले होते. त्याचे वडील मर्चंट नेव्हीमध्ये काम करतात आणि हे कुटुंब कांजूरमार्ग पूर्वेकडील एका पॉश इमारतीत राहते. दुसरा आरोपी १५ वर्षांचा असून तो नववीत शिकतो आणि कुटुंबासह कल्याण पूर्वेला राहतो.
पोलिसांनी दोघांकडून चोरीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानंदानी, पवई येथे राहणाऱ्या फिर्यादी यांनी ४ जुलै रोजी सायंकाळी ७ ते ११ वाजेच्या दरम्यान घरात नसताना फ्लॅटमध्ये घुसून सोने व रोख रक्कम पळवून नेणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहा परत आले असता किचनची खिडकी उघडून कोणीतरी घरात घुसून सोन्याचे दागिने, ३ लाख ४५ हजार रुपयांचे हिरे चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
५ जुलै रोजी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान इमारतीत काम करणाऱ्या सुमारे १०० कामगारांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज वारंवार पाहिल्यानंतर आरोपींची ओळख पटली. त्यांना पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पवई परिसरातील आणखी दोन फ्लॅटमध्ये त्यांनी असेच गुन्हे केले असून या गुन्ह्यांसंदर्भात पवई आणि पार्क साइट पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईत आज पहाटेच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली आहे. बेलापूर येथील शहाबाज गावात तीन मजली इमारत अचानक कोसळली. या इमारतीत तब्बल २६ कुटुंबे राहत होती. ५० नागरिकांना वाचवण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले आहे. तर दोघांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. नागरिक वेळीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी सुदैवाने टळली आहे.
संबंधित बातम्या