Pune Crime News : पुण्यात चारित्र्याच्या संशयावर एका विवाहितेच्या गुप्तांगाला कुलूप लावण्याची घटना ताजी असतांना, आता दोन अल्पवयीन मुलींना फिरायला नेण्याच्या बहाण्याने एका लॉजवर नेऊन ड्रग्स आणि दारू पाजून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकिस आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे शुक्रवारी घडली आहे. या प्रकरणी ड्रग्ज देणारा आणि बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय भिकेन दौड (वय २९, रा. सातकरस्थळ, ता. खेड), श्रीराम संतोष होले, (वय २३, रा. होलेवाडी, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी दोन अल्पवयीन पीडितांना फिरायला नेण्याच्या बहाण्याने एका डोंगरावर घेऊन गेले. यावेळी त्यांनी किरण नामक तिसऱ्या आरोपीकडून ड्रग्स घेतले. दोघींना ड्रग्सचे इंजेक्शन आणि दारू पिण्याचा आग्रहत्यांनी धरला. त्यांनी नकार दिला असता तुम्हाला इथेच सोडून जाऊ अशी धमकी त्यांनी दिली. यानंतर त्यांना इंजेक्शनच्या साह्याने आधी ड्रग्स देऊन आणि नंतर त्यांना दारू पाजली. दोघीही नशेत असतांना आरोपींनी त्यांना लॉजवर लेले. त्या ठिकाणी त्यांनी दोघींवर बलात्कार केला. दरम्यान, पीडित मुली या घरी नशेतअसलेल्या अवस्थेत पोहचल्यावर घरच्यांना धक्का बसला. त्यांनी त्यांची चौकशी केली असता हा प्रकार पुढे आला. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मुलींच्या पालकांनी या प्रकरणी राजगुरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. राजगुरुनगर पोलीसांकडून दोघांना अटक केली असून ड्रग्स देणारा तिसरा आरोपी फरार आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये विवाहितेच्या गुप्तांगाला लावले कुलूप
पिंपरी चिंडवडमधील वाकड येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली. चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. उपेंद्र हुडके असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मूळचा नेपाळमधील बाचकुट या गावातील रहिवाशी आहे.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो पत्नीसह पुण्यातील वाकड येथे वास्तव्यास होता. परंतु, उपेंद्र त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यामुळे त्यांच्यात वारंवार भांडण होत असे. दरम्यान, ११ मे २०२४ रोजी हुडके दाम्पत्यांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले. मात्र, यावेळी उपेंद्रने कहरच केला. त्याने पत्नीला मारहाण करत तिच्या गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला खिळे ठोकले आणि कुलूप लावले. यात त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाकड पोलिसांनी रुग्णालयात महिलेचा जबाब नोंदवला.
संबंधित बातम्या