Pune hadapsar Gang Rape rape case : पुण्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना हडपसर येथे उघडकीस आली आहे. बारामती येथून घरी कुणालाही न सांगता आलेल्या दोन मुलींना एका खोलीत नेऊन त्यांना दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी हा अल्पवयीन आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती), यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे, (वय २१, रा. सावळ, ता. बारामती) अशी अटक इकरण्यात यएलल्या आरोपींची नावे आहेत.
बारामती येथील दोन अल्पवयीन मुली या गेल्या शनिवार (दि १४) पुण्यात आल्या होत्या. याची माहिती त्यांनी घरी कुणालाही सांगितली नव्हती. दरम्यान मुली घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्या हरवल्याची तक्रार बारामती पोलिस ठाण्यात दिली होती. बेपत्ता झालेल्या या मुली मैत्रिणी असून त्या दोघी वेगवेगळया शाळेत शिक्षण घेत होत्या. बस पकडून त्या पुण्यात आल्या होत्या. त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे या त्यांच्या मित्राशी संपर्क केला. आटोळेने दोघींना हडपसर येथील त्याच्या खोलीवर बोलवले. याची माहिती त्याने त्याच्या मित्रांना देखील दिली. आटोळे हा त्याच्या एका आणखी एका मित्रालला घेऊन पुण्यातील हडपसर येथे खोलीवर आणले.
त्याने मित्रांसोबत या मुलींना त्याच्या एका मित्राच्या खोलीवर नेले. या ठिकाणी त्यांनी दोन मुलींना दारू पाजली. यानंतर मुली नशेत असताना चौघांनी त्यांच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपींनी मुलीला सोडून दिले. मुली सकाळी हडपसर बसस्टॉपवर आल्या. यावेळी त्यांनी एका व्यक्तीच्या फोन वरुण घरी फोन केला.
यावेळी मुलीच्या आईने फोन उचलला. त्यावेळी तिने तिच्यावर बेटलेला प्रसंग सांगितला. याची माहिती बारातमी पोलिसांना देखील देण्यात आली. बारामती पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधून मुलींना ताब्यात घेतले. बारामती पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांचे समुपदेशन देखील करण्यात आले. यानंतर दारु पाजून आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर आटोळे याला अटक केली असून इतरांना देखील अटक करण्यात आली आहे.