Mumbai Accident : मुंबईतील गोरेगाव येथे अपघात, उड्डाणपुलावरून पडून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Accident : मुंबईतील गोरेगाव येथे अपघात, उड्डाणपुलावरून पडून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

Mumbai Accident : मुंबईतील गोरेगाव येथे अपघात, उड्डाणपुलावरून पडून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

Updated Jul 03, 2024 11:43 AM IST

Mumbai Goregaon flyover Accident: गोरेगाव उड्डाणपुलावर झालेल्या मोटारसायकल अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अपघाताच्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत. अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.

मुंबईच्या गोरेगाव येथील उड्डाण पुलावरून पडून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या गोरेगाव येथील उड्डाण पुलावरून पडून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरात दुचाकी उड्डाणपुलावरून २० फूट खाली कोसळल्याची घटना घडली. या घटनेत दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. उड्डाणपुलाखाली दुचाकीजवळ त्यांचे मृतदेह पडलेले आढळल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले. यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. याप्रकरण पोलीस अधिक तपास करीत आहे.

वैभव गमरे (वय, २८) आणि त्याचा मित्र आनंद इंगळे अशी मृतांची नावे आहेत. गमरे हे एका खासगी कंपनीत नोकरीला असून पत्नीसह गोरेगाव पश्चिमेकडील तीन डोंगरी येथे वास्तव्यास होते. तर, इंगळे गोरेगाव पूर्व येथील रहिवासी होते. त्यांचे कुटुंबीय अकोला येथे त्यांच्या मूळ गावी राहतात.

गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असताना पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला. गोरेगाव पश्चिमेकडील एमटीएनएल जंक्शनच्या दिशेने जाणाऱ्या पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाखाली दोन जण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मोबाइल १ व्हॅनवरील नाईट ड्युटी कॉन्स्टेबलला पहाटे ४ वाजून २५ मिनिटांनी मिळाली. कॉन्स्टेबलने घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्ध अवस्थेत असलेल्या दोघांना बाळ ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी गमरे यांच्या पत्नीचा शोध घेऊन त्यांना अपघाताची माहिती दिली आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप भोसले यांनी सांगितले की, गमरे आणि इंगळे दुचाकीवरून नेमके कुठे जात होते? हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, ही बाईक मृतांमध्ये कोण चालवत होते, याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे आम्ही अद्याप निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केलेला नाही,' अशी माहिती गोरेगाव पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर