Pune porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात लक्झरी पोर्श कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुण तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास बॉलर पबजवळ घडली. कारचालक अल्पवयीन असून तो एका नामांकित रिअल इस्टेट डेव्हलपरचा मुलगा आहे. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर ज्या पोर्शे कारने या दोघांना धडक दिली त्या कारचा चालक १७ वर्षांचा म्हणजेच अल्पवयीन आहे. या प्रकरणी अनिशचा मित्र अकीबने दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीला न्यायालयापुढे हजार केले असता त्याने, नायल्याने त्याला अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहायला लाऊन त्याची जामिनावर सुटका केली आहे. १२ तासांतच त्याला जामीन मिळाल्याने मृतांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे.
पुण्यात पब संस्कृती वाढत चालली आहे. या संस्कृतीमुळे पुण्यातील तरुणाई वाममार्गाला लागत असल्याचा आरोप केला जात असतांना ही घटना घडल्याने आता पुन्हा रात्री सुरू असणाऱ्या पबचा आणि पुण्यात रंगणाऱ्या पार्ट्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अल्पवयीन मुलगा हा पुण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. तो दारुच्या नशेत कार चालवत होता. यातच त्याने पब मधून दुचाकीवरून घरी जात असणाऱ्या दोघांना पाठीमघून जोरेआर धडक दिली. यात दोघांचाही मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी आरोपीला चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले आहे. त्याच्या रक्ताचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला जामीनही देण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी हा गंभीर गुन्हा असतांनाही जामीन पात्र कलम लावल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना विचारले असता, या प्रकरणातला आरोपी अल्पवयनी असल्याने त्याच्यावर भारतीय दंडसंहितेतील तरतुदीनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल केला आहे. मोटार वाहन कायद्यातील उल्लंघन केल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील व ज्या बारने या मुलाला आणि त्याच्या मित्रांना मद्य दिलं त्यांच्याविरोधात कलम ७५ आणि ७७ अंतर्गत कारवाई करणार असून गुन्हा दाखल करणार असल्याचे आयुक्त म्हणाले.
पोलिसांनी १७ वर्षीय आरोपीला रविवारी दुपारी विशेष सुट्टीच्या न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी त्याची रवानगी कोठडीत करण्याची मागणी केली. आरोपी साडेसतरा वर्षांचा असून त्याला प्रौढ समजून खटला चालवला जावा अशी मागणीही पोलिसांनी केली. मात्र न्यायालयाने या आरोपीला काही अटींवर जामीन मंजूर केला आहे.
बचाव पक्षांचे वकील प्रशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलिसांना पूर्णपणे सहकार्य केले जाणार आहे. न्यायालयाने अल्पवयीन मुलाला कार अपघातावर निबंध लिहिण्यास सांगितला आहे. पोर्शेने दुचाकीला टक्कर दिली आणि त्यात दोन जणांचा मृत्यू झाला.
पुण्यातल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नयालयाने आरोपीला १५ दिवस येरवडा विभागात ट्राफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचं नियोजन करण्याचे देखील आदेश दीले आहे. यानंतर अपघातावर त्याने ३०० शब्दाचा निबंध लिहावा आणि दारूचे व्यसन सुटेल अशा डॉक्टरकडून उपचार घ्यावेत असे आदेश दिले आहे. तसेच त्याचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्याचे देखील न्यायालयाने सांगितले आहे.
संबंधित बातम्या