Saswad Accident : आंबेगाव तालुक्यातून सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीला येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. या टेम्पोला समोरुन येणाऱ्या टेम्पोने घडक दिली असून यात दोघे जण ठार झाले तर १३ जण जखमी झाले आहेत. ही घटना सासवड रस्त्यावर बेलसर गावाजवळ मध्यरात्री घडली. जखमींवर जेजूरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टेम्पो चालक जितेंद्र ज्ञानोबा तोत्रे (वय ३५, रा. कुरवंडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), आशाबाई बाळकृष्ण जरे (वय ५०, रा. जरेवाडी, ता. खेड) असे या अपघात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर १३ भाविक जखमी असून, त्यांच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व जण आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी गाव परिसरातून १ सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीला निघाले होते.
त्यांच्या टेम्पो हा सासवड-नीरा रस्त्यावर बेलसर गावाजवळ मध्यरात्री अडीचच्या सुमारास आला. यावेळी समोरुन येणाऱ्या भरधाव टेम्पोने भाविकांच्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर १३ जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी नागरिकांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी दुसऱ्या टेम्पो चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील वासुंदे (ता दौंड) येथील उड्डाण पुलावर भरधाव चारचाकी दुभाजकाजकावर चढून पुलाच्या कठड्याला धडकली. हा अपघात सोमवारी (दि ३०) दुपारी १२ च्या सुमारास घडला. या घटनेत एक महिला व पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. भरधाव स्वीफ्ट गाडी पाटसच्या बाजूने बारामती कडे जात होती. वासुंदे येथील उड्डाण पुलावरील दुभाजकावर एक चाक चढले. तशीच अंदाजे १०० फुट अंतरापर्यंत गाडी दुभाजकावरुन पुढे गेली व मध्यभागी असलेल्या पुलाच्या कठड्याला धडकून रस्त्यावर पडली. यावेळी मोठा आवाज झाला. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढून महामार्ग रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी बारामती येथे पाठवले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या