Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा मेगाब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक बंद-two hours traffic block between 12 noon to 2 pm on mumbai pune expressway on today 21 november ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा मेगाब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक बंद

Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा मेगाब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक बंद

Nov 21, 2023 09:40 AM IST

Mumbai Pune express way block today : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर वाहतूक नियोजनाच्या कामासाठी गँट्री उभारण्याचे काम सुरू असून यामुळे आज मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत या मार्गावर वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.

Mumbai Pune express way block today
Mumbai Pune express way block today (HT)

Mumbai Pune express way block today : मुंबई पुणे एक्सप्रेसवे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आज जर तुम्ही एक्सप्रेस वे ने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज मंगळवारी (दि २१) २ तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या बाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (एमएसआरडीसी)माहिती दिली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर आज ३५/५०० किमी अंतरावर हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई कडून पुण्याकडे येणारी वाहतूक ही १२ ते २ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे.

Thane Traffic : आरक्षणासाठी जरांगे यांची ठाण्यात जाहीर सभा; पोलिसांचा वाहतुकीत मोठा बदल, हे रस्ते राहणार बंद!

मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर गेल्या काही दिवसांपासूंन ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँट्री बसवण्याचे काम सुरू आहे. यामुळे या मार्गावर वाहतूक ब्लॉक घेतला जात आहे. आज देखील हे काम केले जाणार असल्याने दुपारी १२ ते २ या वेळेत मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. या काळात मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे.

Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मानकरी, हर्षवर्धन सदगीरवर एकतर्फी मात

ही वाहने शेडुंग फाटा येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट येथे पुन्हा मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर मार्गस्थ केली जाणार आहे. या मार्गावर गँट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी २ नंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही पुन्हा सुरळीत केली जाणार आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने वाहनं ये-जा करत असतात. परंतु आज १ तास या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप होणार आहे. या मार्गावर अपघात आणि अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. तब्बल ३४० कोटींचा हा प्रकल्प आहे. सध्या याची कामे या मार्गावर सुरू आहेत.

Whats_app_banner
विभाग