मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

May 18, 2024 07:38 AM IST

Mumbai Pune expressway mega block : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज शनिवारी आणि रविवारी दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात या मार्गावरील वाहतूक ही वळवण्यात आली आहे.

 मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज शनिवारी आणि रविवारी दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज शनिवारी आणि रविवारी दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. (HT)

two hour traffic block on the Mumbai Pune expressway : राज्यातील सर्वाधिक व्यस्त महामार्ग असणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे जर आज शनिवारी आणि उद्या रविवारी या महामार्गाने जर तुमच्या प्रवासाचे नियोजन असेल तर या मार्गावरच्या वाहतुकीसंदर्भात अपडेट जाणून घ्या. या मार्गावर गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी दोन दिवस सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत या मार्गावरची वाहतूक ही बंद राहणार आहे. या काळात येथील वाहतूक ही वळवण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नवी यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. या साठी या मार्गावर वारंवार ब्लॉक घेतला जातो. याच हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर किलोमीटर क्र. २७ आणि कि.मी. क्र. ५५ येथे १८ आणि १९ मे या दोन दिवशी कमानीची (गॅन्ट्री) तांत्रिक तपासणी, दुरुस्ती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात सर्व प्रकारच्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update: पुणे, कोल्हापूर, सातारा, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता! मुंबईत उकाडा कायम

अशी आहे पर्यायी वाहतूक

पुणे वाहिनीवर १८ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरील सर्व वाहने शेडूंग, खोपोली मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ येथून पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत. तसेच १९ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करुन द्रुतगती मार्गावरील सर्व वाहने कुसगाव पथकर नाक्यावरुन राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधी पाहून प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या ठिकाणी करा तक्रार

द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे रस्ते महामंडळाने सांगितले.

टी-२० वर्ल्डकप २०२४