मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral News : मोठ्याने ढेकर दिल्याने शेजाऱ्यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; पोलिसांत तक्रार दाखल

Viral News : मोठ्याने ढेकर दिल्याने शेजाऱ्यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; पोलिसांत तक्रार दाखल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 31, 2023 12:42 PM IST

Indore Viral News : शेजारी राहणारी महिला सतत मोठ-मोठ्याने ढेकर देत असल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Indore Madhya Pradesh Viral News
Indore Madhya Pradesh Viral News (HT)

Indore Madhya Pradesh Viral News : महिलेने मोठ-मोठ्याने ढेकर दिल्याच्या कारणावरून दोन गटात फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सर्वात सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या इंदूरमध्ये ही विचित्र घटना घडली असून हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहचलं आहे. फक्त फक्त ढेकर दिल्यानं सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहचला आहे. त्यानंतर आता या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. त्यामुळं अनेकांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त करत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात आता पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील इंदूर शहरातील एका सोसायटीत राहणारी महिला जोरजोरात ढेकर देत असल्याने त्यावर शेजाऱ्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळं दोन गटात शिवीगाळ झाल्यानंतर बाचाबाची झाली. त्यानंतर प्रकरण निवळलं. परंतु तासाभरानंतर दोन्ही गट पुन्हा एकदा आमने-सामने आले. शेजाऱ्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जखमी केलं. याशिवाय ढेकर देणाऱ्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर आता हाणामारीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने दोन गटातील हाणामारीत कुणालाही गंभीर इजा झालेली नाही.

ढेकर देण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात इंदूरच्या एमआयजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळं आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हाणामारी खरंच ढेकर दिल्यावरून झाली की त्यामागे अन्य काही कारणं आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. संबंधित महिला दररोज सकाळी आणि दुपारी मोठ-मोठ्याने ढेकर देत असते, त्यामुळं आमची झोप खराब होत असून लहान मुलांनाही त्रास होत असल्याचं शेजाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच संबंधित महिला आजारी असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचा दावा दुसऱ्या गटाकडून करण्यात आला आहे.

WhatsApp channel