Pune wanwadi Crime : राज्यात बदलापूर प्रकरण ताजे असतांना देखील मुलींवरील अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाही. बुधवारी पुण्यात वानवडी येथे एका स्कूलबस चालकाने शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. या घटनेमुळे संताप उठला असून मुलींनी याची माहिती पालकांना दिल्यावर या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात स्कूल व्हॅन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय जेटिंग रेड्डी (वय ४५, स्कूल व्हॅन चालक, रा. वैदवाडी हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. ३० सप्टेंबर रोजी शाळेजवळ व्हॅनमध्ये घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीया वानवडी येथील एका मोठ्या शाळेत शिक्षण घेतात. त्या स्कूलबसने शाळेत जातात. ३० सप्टेंबररोजी पीडित मुलगी ही व्हॅनमधून घरी येत होती. यावेळी तिची मैत्रीण देखील व्हॅनमध्ये होती. दोघीही व्हॅनमध्ये एकट्या होत्या. यावेळी आरोपी रेड्डीने ही संधी साधून दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केले. तसेच ही बाब कुणाला सांगू नका म्हणून धमकावले सुद्धा.
दरम्यान, पीडित मुली या घरी आल्या. यातील एका मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार पालकांना सांगितला. यानंतर या घटनेचा उलगडा झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वडिलांनी मुलीला दुचाकीवरुन शाळेत सोडले. मुलीच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन पालकांना याबाबतची माहिती दिली. पालकांनी मुलीची चौकशी केली. तेव्हा आरोपी संजय अंकल यांनी अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली. त्यानंतर वानवडी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पालकांनी थेट वानवडी पोलिस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. महिला आणि मुलींवर अत्याचार वाढले आहे. कोरेगाव पार्क येथील वाडिया कॉलेज येथील एका मुलीवर अत्याचाराची घटना ताजी असतांना आता दोन मुलींवर स्कूल व्हॅनमध्ये अत्याचार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पालक संतप्त झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या