मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lightning Struck In Jamod : वीज कोसळल्यानं बुलढाण्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; एक जखमी!
Lightning Struck In Jamod Buldhana
Lightning Struck In Jamod Buldhana (HT)

Lightning Struck In Jamod : वीज कोसळल्यानं बुलढाण्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; एक जखमी!

21 August 2022, 8:51 ISTAtik Sikandar Shaikh

Lightning Struck In Jamod Buldhana : शेतीत काम करत असताना अचानक पाऊस सुरू झाल्यानं तिघे झाडाखाली येऊन थांबले होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे.

Lightning Struck In Jamod Buldhana : गेल्या ४८ तासांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं अनेक नद्या-नाल्यांना पूर आला असून त्यात अनेक ठिकाणी लोक वाहून गेल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत, परंतु आता पाऊस सुरू असताना वीज कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली आहे, जिल्ह्यातील जामोद तालुक्यात अचानक वीज कोसळल्यानं दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे. त्यामुळं या घटनेमुळं जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पावसामुळं झाडाखाली थांबले आणि अंगावर वीज कोसळली…

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील जामोद तालुक्यातल्या निमकराळमध्ये जोरदार पाऊस सुरू होता, त्यावेळी शेतीत काम करत असलेले अमोल रघुनाथ पिसे, मधूकर तुळशुराम उगले आणि त्यांच्या पत्नी यमुना मधूकर उगले यांनी एका झाडाखाली आसरा घेतला, मात्र त्यांच्यावर काळानं घाला घातला, झाडाखाली उभे असलेल्या या तिघांवर अचानक वीज कोसळली, त्यात अमोल रघुनाथ पिसे आणि मधूकर तुळशुराम उगले या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून यमुना मधूकर उगले या जखमी झाल्या आहेत.

ही घटना आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळी त्यांना अमोल आणि मधुकर यांचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं, तर यमुना मधूकर उगले या जखमी असल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं राज्यातील अनेक नद्यांना पूर आला असून धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. विदर्भात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असून आता नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावल्यानं गंगापूर आणि जायकवाडी धरणांतून विसर्ग वाढवण्यात आला आहे.