Mumbai news : मुंबईत दहिसर येथे एका खासगी जागेत असलेल्या जय महाराष्ट्र खाणीत दोन पुरुषांचा मृतदेह आढळला. ही घटना रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास उघडकीस आली. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, हा घातपात आहे की आत्महत्या या बाबत माहिती मिळू शकली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज रामचंद्र सुर्वे (वय ४५), चितामणी वारंग (वय ४३) अशी या घटनेत मृत्युमुखी झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहिसर येथे हनुमान टेकडी सौरज पटेल मार्ग अशोकवन येथे जय महाराष्ट्र खदान आहे. ही खासगी जागेवर असून अनेक दिवसांपासून बंद आहे. दरम्यान, रविवारी रात्री या खाणीत दोघे जण बुडल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी खाणीत किनाऱ्या जवळ दोन मृतदेह तरंगत असल्याचे त्यांना दिसले.
अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला. प्राथमिक तपासात दोघांची नावे पोलिसांना समजली. त्यांना जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पाण्यात बुडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान, या दोघांनी आत्महत्या केली, की त्यांचा खून करून या ठिकाणी मृतदेह आणून टाकण्यात आले, या संदर्भात आता पोलिस तपास करत आहेत.
मुंबईत अनेक बंद असलेल्या खानी आहेत. या खानी खोल असून यात पाणी साचले आहे. परिणामी या पाण्याचा अंदाज अनेकांना येत नाही. त्यामुळे या ठिकाणी आशा दुर्घटना घडतात. यामुळे या खानी कायम स्वरूपी बंद करण्यात याव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
संबंधित बातम्या