गटारावर फटाके फोडताना मोठा स्फोट! पाच मुले जखमी; पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागातील घटना, व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गटारावर फटाके फोडताना मोठा स्फोट! पाच मुले जखमी; पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागातील घटना, व्हिडिओ व्हायरल

गटारावर फटाके फोडताना मोठा स्फोट! पाच मुले जखमी; पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागातील घटना, व्हिडिओ व्हायरल

Oct 29, 2024 12:15 PM IST

pune drainage blast : पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोसायटीच्या गटारीच्या झाकणावर फटाके फोडतांना चेंबरमधील गॅसमुळे मोठा स्फोट झाला असून यात दोन ते तीन मुळे जखमी झाले.

गटारावर फटाके फोडताना मोठा स्फोट! पाच मुले जखमी; पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागातील घटना, व्हिडिओ व्हायरल
गटारावर फटाके फोडताना मोठा स्फोट! पाच मुले जखमी; पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागातील घटना, व्हिडिओ व्हायरल

pune drainage blast : पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोसायटीच्या गटारीच्या झाकणावर फटाके फोडतांना चेंबरमधील गॅसमुळे अचानक मोठा स्फोट झाला असून यात चार ते पाच मुले जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून फटाके फोडत असतांना काळजी घेण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  गौरांग रेसिडेन्सी, मानाजीनगर, नर्हे येथे राहणाऱ्या ४-५ मुले ही सायटीच्या आवारात फटाके फोडत होते. त्यांनी  फटाके ड्रेनेज लाईनच्या वर फोडण्यास सुरुवात केली.  ड्रेनेज चेंबरमध्ये तयार झालेल्या वायूंमुळे मोठा स्फोट झाला. यावेळी आगीचा गोळा आणि धुळ हवेत उडाली. स्फोटांमुळे गटाराचे झाकण देखील हवेत उडाले.

या झाकणाचे तुकडे मुलांना लागल्याने दोन ते तीन मुले जखमी झाले. या मुलांना पालकांनी तातडीने दवाखान्यात नेले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती सिंहगड रस्ता पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. तब्बल पाच मुले या घटनेत जखमी झाली असून ही घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल आहे.

सध्या दिवाळी असल्याने मुले फटाके फोडत असतात. मुले फटाके फोडत असतांना त्यांच्या जवळ थांबणे गरजेचे आहे. तसेच वीजेचा खांब, दुचाकीजवळ फटाके फोडू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर