पुणे : पुणे नगर मार्गावर आज भीषण अपघात झाला. दोन पीएमटीची समोरासमोर धडक झाली असून या अपघातात २९ जण जखमी झाले आहेत. यात १७ महिलांचा समावेश आहे. हा अपघात ११ च्या सुमारास झाला.
महपालिका ते तळेगाव ढमढेरे मार्गावरील एक बस जात होती. यावेळी दुसरी बस बस ही बीआरटी मार्गातून निघाली होती. त्यावेळी वाघोलीकडून निघालेली बस ही दुसऱ्या पीएमटी बसवर जोरदार आदळली. या घटनेत बसमधील चालक वाहक आणि प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये १७ महिलांचा समावेश असून जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींच्या चेहरा आणि हाताला दुखापत झाली आहे.
या अपघातात दोन्ही बसचे मोठे नुकसान झले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
संबंधित बातम्या