Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट; बाप्पाला निरोप देताना अनेक जण बुडाले! नाशिक, अकोला, अमरावतीत हळहळ-two best friend drown during ganesh idol immersion in nashik ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट; बाप्पाला निरोप देताना अनेक जण बुडाले! नाशिक, अकोला, अमरावतीत हळहळ

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट; बाप्पाला निरोप देताना अनेक जण बुडाले! नाशिक, अकोला, अमरावतीत हळहळ

Sep 18, 2024 01:24 PM IST

Nashik Drown News: नाशिकमध्ये गणेश विसर्जनदरम्यान दोन जिवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गणेश विसर्जनदरम्यान दोन जिवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू
गणेश विसर्जनदरम्यान दोन जिवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू

Two youths drown during Ganesh idol immersion In Nashik: नाशिकमध्ये गणेश विसर्जनदरम्यान दोन जिवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बाप्पाला निरोप देण्यासाठी पाण्यात उतरले असता दोघेही एका खड्ड्यात पडले. मदत पोहचेपर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.नाशिकच्या पार्थर्डी फाटा परिसरात ही घटना घडली. घरातील तरुण मुलांच्या मृत्युने त्यांच्या कुटुंबाना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार गाडे आणि स्वयंम मोरे अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून दोघेही जिवलग मित्र होती. ओंकार हा केटीएचएम महाविद्यालयात शिकत होता. तर, स्वयंम हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. ओंकार आणि स्वयंम काल संध्याकाळी मित्रांसोबत वालदेवी नदीत गणपती विसर्जनासाठी गेले. त्यावेळी नदीपात्रातील एका खड्ड्यात ते पडले. पाण्यातून बाहेर येता न आल्याने दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या घटनेने नाशिक शहरात शोककळा पसरली.

अमरावती: गणेश विसर्जनदरम्यान तिघांचा मृत्यू

पूर्ण नगर नदीपात्रामध्ये गणपती विसर्जन करताना दोन जण वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेत दोन्ही तरुणांच मृत्यू झाला. गजानन ठाकरे आणि अमोल ठाकरे अशी या दोन तरुणांची नावे आहेत. तर, अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या एका २७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. राजेश संजय पवार असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

गणेश विसर्जनदरम्यान इंदापूर आणि अकोल्यात मुले बुडाली

इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे नीरा नदी पात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना काल दुपारी घडली. अनिकेत विनायक कुलकर्णी असे बुडालेल्या मुलाचे नाव असून गणेश विसर्जनासाठी इतर मुलांसह नदीपात्रात गेला होता. या व्यतिरिक्त अकोल्यातही गणेश विसर्जनादरम्यान एकाचा बुडून मृत्यू झाला. गणेश गायकवाड (वय, १८) मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश हा अकोला शहरातील अकोटफैल भागात वास्तव्यास होता.गणेश विसर्जनावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Whats_app_banner
विभाग