मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Crime News : बांगलादेशी नागरिकांची महाराष्ट्रात घुसखोरी; पोलिसांकडून दोन आरोपींना अटक

Crime News : बांगलादेशी नागरिकांची महाराष्ट्रात घुसखोरी; पोलिसांकडून दोन आरोपींना अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 05, 2022 04:24 PM IST

Bangladeshi Infiltrators : खोट्या जन्मदाखल्याच्या आधारावर महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.

Bangladeshi Infiltrators In Maharashtra
Bangladeshi Infiltrators In Maharashtra (HT_PRINT)

Bangladeshi Infiltrators In Maharashtra : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगावात दोन बांगलादेशी नागरिक राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळं राज्यात खळबळ उडाली असून त्यानंतर आता पोलिसांनी आरोपींना अटक केली असून आरोपींना कोर्टानं दोन वर्षांचा कारावास सुनावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमीन अन्सारी आणि ताहीर अली युसूफ अली हे दोन बांगलादेशी नागरिक मालेगावात खोट्या जन्मदाखल्याचा वापर करत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याशिवाय प्रशासनाची फसवणूक करत अन्य कागदपत्रंही मिळवली होती. त्यानंतर पोलिसांनी मालेगावात छापेमारी करत दोन्ही आरोपींना अटक केली. गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही आरोपी महाराष्ट्रात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात बेकायदेशीरित्या प्रवेश केल्याच्या कारणावरून दोन वर्षांचा कारावास आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे.

बांगलादेशी घुसखोरांनी मालेगावात महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या घेऊन आधारकार्ड, पॅनकार्ड, बॅंकखाते आणि रेशन कार्ड तयार केलं होतं. याशिवाय बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्टही तयार केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी दोन बांगलादेशी घुसखोरांना अटक केल्यानंतर त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असून भारतात कशा प्रकारे बेकायदेशीररीत्या प्रवेश केला, याचाही खुलासा केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग