मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  akola crime : अकोल्यात अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण करून नरबळी देण्याचा प्रयत्न

akola crime : अकोल्यात अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण करून नरबळी देण्याचा प्रयत्न

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 26, 2024 03:55 PM IST

akola crime : अकोला जिल्ह्यातील आकोट येथे एका अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याचा नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

akola crime
akola crime

akola crime news : अकोला जिल्ह्यातील आकोट येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील आकोट फैल परिससरातील नायगाव येथे एका अडीच वर्षीय बालकाचे अपहरण करून  त्याचा नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आरोपीने या पूर्वही या बलकाच्या अपरणाचा प्रयत्न केला आहे. त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

Maratha Reservation: मोठी बातमी, अखेर १७ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे

यार मोहम्मद लाल मोहम्मद असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी मुलाचे वडील मोहम्मद मीर आलम मोहम्मद मोइन (वय ३४, नायगाव, मीलन नगर) यांनी आकोट फैल पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी आणि आरोपी यांचा मुलगा शनिवारी सकाळी ९ वाजता घरासमोर खेळत होते. यावेळी आरोपी यार मोहम्मद लाल मोहम्मद याने फिर्यादीचा अडीच वर्षाच्या मुलाला जबरदस्तीने दुचाकी बसवून नेत अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

WTC Points Table : कसोटी मालिका जिंकूनही भारत अव्वल नाही, अजूनही हा संघ नंबर वन! पाहा

यावेळी मो. मीर आलम यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी यार मोहम्मद लाल मोहम्मद याने फीर्यादीस शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी आकोट फैल पोलिसांनी आरोपी यार मोहम्मद लाल मोहम्मद याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोहम्मद मीर आलमने दिलेल्या तक्रारीनुसार यापुर्वी २० फेब्रुवारी रोजीही त्यांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याची सुटका करण्यात आली होती. तर आरोपीने फिर्यादीच्या अडीच वर्षीय मुलाला मोर्णा नदीकाठावर नेत मारहाण देखील केली होती. यावेळी देखील त्याचा नरबळी देण्याचा प्रयत्न फसला होता. दरम्यान, शनिवारी देखील त्याने पुन्हा फिर्यादीच्या मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला.

WhatsApp channel

विभाग