मुंबई : ट्विटरने अजित पवार गटाचे ट्विटर हँडल सस्पेंड केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात आले आहे. शरद पवार गटाने तक्रार केल्यानंतर एक्सकडून म्हणजेच ट्विटरने ही कारवाई केली आहे. ट्विटर खाते सस्पेंड केल्याचा मेसेज अजित पवार गटाच्या ट्विटर हॅण्डलवर लिहून असलेला दिसत आहे.
अजित पवार गटाने राष्ट्रवादी कॉँग्रेस मधून फारकत घेत भाजप आणि शिंदे गटाशी हातमीळवणी केली. तसेच अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते देखील सत्तेत सहभागी झाले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रावादी कॉँग्रेस पक्षावर दावा देखील सांगितला. यामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाने अजित पवार गटाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अजित पवार गटाचे NCPSpeaks1 हे ट्विटर हँडल आहे तर शरद पवार गटाचे NCPSpeaks हे ट्विटर हँडल आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल असलेले NCPSpeaks1 हे खाते सस्पेंड करण्यात आले आहे. त्यांच्या पेजवर नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांचे खाते सस्पेंड करण्यात आल्याचे लिहिले आहे. ट्विटरने तशी माहिती देखील दिली आहे.
अजित पवार गटाने सारखे नाव ठेवल्याने शरद पवार गटाने ट्विटरकडे तक्रार केली होती. त्यानंतर ट्विटरने कारवाई करत अजित पवार गटाचे ट्विटर हॅण्डल सस्पेंड करण्यात आले आहे. दरम्यान अजित पवार गटाने देखील त्यांची बाजू ट्विटरला कळवली आहे. हे ट्विटर हॅण्डल लवकरच सुरू होईल अशी माहिती अजित पवार गटाकडून देण्यात आली.
अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यावर शरद पवार देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी या संदर्भात विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.