Pulses Price Hike : देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण असतांना महागाई कमी होण्याऐवजी वाढतांना दिसत आहे. जेवणात महत्वाचा घटक असणाऱ्या डाळींच्या किमितीत मोठी वाढ झाली आहे. तूळडाळ १५ तर मुगडाळ १० रुपयांनी महाग झाली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून या दोन्ही डाळी गायब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देशात महागाई वाढत आहे. ही महागाई कमी होण्याचे नाव घेईना. डाळी या सर्वसामान्य नागरिकांच्या जेवणातील महत्वाचा घटक आहे. या डाळीचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढते आहे. तूळडाळीचे दर १०० री पार गेले आहे. त्या पाठोपाठ आता मुगडाळ आणि चणाडाळ देखील महाग झाली आहे. सर्वसामान, तूरडाळींचे उत्पादन हे नोव्हेंबरदरम्यान बाजारात दाखल होते. राज्यात तूळडाळ ही प्रामुख्याने विदर्भात अकोला, यवतमाळ व मराठवाडा येथील लातूरमध्ये होते. यावर्षी सरासरी उत्पादनात सात टक्यांनी वाढ होऊन देखील वाढत्या मागणीमुळे डाळींच्या दरात वाढ झाली आहे.
राज्यात मार्च महिन्यापासून डाळीचे दर वाढत आहेत. मुंबईत मार्च महिन्यात तूरडाळी घाऊक बाजरातील दर हा १२० ते १४० रुपये प्रतिकिलो होता. हा दर आता १४० ते १७० रुपये झाला आहे. तर किरकोळ बाजारात हा दर १४० रुपयांवरून १७० ते १९० रुपये प्रतिकिलो झाला आहे. घाऊक बाजारात ९० ते १०० रुपये असलेली मूगडाळ १०० रुपयांपर गेली आहे. या डाळीचा दर ११० ते १२० रुपये प्रतिकिलो झाला आहे. किरकोळ बाजारात मूगडाळीचा दर १४० रुपये प्रति किलो ऐवढा झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व विक्रेते, गोदाम मालक, मिल मालकांना तूरडाळीचा साठा घोषित करण्याची सूचना दिल्या आहेत. विक्रेत्यांना लवकरच साठामर्यादा लागू होण्याची शक्यता असल्याचे अखिल भारतीय व्यापारी महासंघाने म्हटले आहे.
या बाबत भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) महाराष्ट्र सचिव शंकर ठक्कर म्हणाले, लहान व्यापारी, किरकोळ विक्रेते व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुपर मार्केट साखळी दुकानदारांना १५ एप्रिलपर्यंत त्यांच्याकडील तूरडाळीचा साठा घोषित करण्यास सांगितले. सध्या मुंबईत आवक आणि मागणी सारखीच आहे.
मुंबईत गेल्या वर्षी १५ टन तूरडाळ येत होती. मात्र, दरवाढ झाल्यामुळे ही आवक कमी झाली. ही आवक आता ३ टनांवर आली आहे. मात्र, मुंबईकरांची डाळीची मागणी ही ५ टनांपेक्षा जास्त आहे. दर जास्त असल्याने किरकोळ व्यापारी कमी प्रमाणात डाळ खरेदी करतात. तर ही डाळ टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याकडे किरकोळ विक्रेत्यांचा दृष्टीकोण असून टंचाईसदृश्य स्थिती नसल्याचे व्यापऱ्यांचे म्हणणे आहे.