शरद पवारांच्या पक्षाला निवडणूक आयोगाचा दिलासा! ट्रम्पेटचं मराठी भाषांतर तुतारी नव्हे, ट्रम्पेट राहणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शरद पवारांच्या पक्षाला निवडणूक आयोगाचा दिलासा! ट्रम्पेटचं मराठी भाषांतर तुतारी नव्हे, ट्रम्पेट राहणार

शरद पवारांच्या पक्षाला निवडणूक आयोगाचा दिलासा! ट्रम्पेटचं मराठी भाषांतर तुतारी नव्हे, ट्रम्पेट राहणार

Nov 01, 2024 09:39 AM IST

Election Commission on Trumpet : निवडणूक आयोगाच्या ट्रम्पेट या मुक्त चिन्हाचे मराठी नाव तुतारी ऐवजी ट्रम्पेट असेच ठेवले जाणार आहे. या बाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. या निर्यामुळे शरद पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ट्रम्पेटचं मराठी भाषांतर तुतारी नाही तर ट्रम्पेटचं राहणार; शरद पवारांना दिलासा
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ट्रम्पेटचं मराठी भाषांतर तुतारी नाही तर ट्रम्पेटचं राहणार; शरद पवारांना दिलासा

Election Commission on Trumpet : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत निवडणूक चिन्ह ट्रम्पेटचं मराठी भाषांत तुतारी केल्याने शरद पवार यांच्या पक्षाला मोठा फटका बसला होता. अनेकांना ट्रम्पेट आणि तुतारी यांच्यातील भेद समजला नसल्याने त्यांची ही जागा गेल्याचा दावा शरद पवार गटाच्या नेत्यांनी केला. त्यामुळे शरद पवार गटाने या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. इंग्रजी वाद्य ट्रम्पेट आणि मराठी वाद्य तुतारी यांच्यात फरक असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सांगितलं होतं. दरम्यान, निवडणूक आयोगाने या निवडणूक चिन्हाबाबत आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत मुक्त चिन्हाचे वाटप करत असतांना ट्रम्पेटचे मराठी भाषांतर तुतारी न करता ट्रम्पेट ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला ?

केंद्रीय निवडणूक आयोगाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला राज्याचा आणि राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. त्यांच्या पक्षाला मॅन ब्लोइंग तुर्हा म्हणजेच तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे. याचे मराठी भाषांतर हे आयोगाने तयार केल्यानुसार तुतारी वाजविणारा माणूस असे केले आहे. तर ट्रम्पेटचे भाषांतर देखील तुतारी असे करण्यात आल्याने दोन्ही चिन्हांच्या नावात साधर्म्य होते. यामुळे मोठा संभ्रम निर्माण होत असल्याने मुक्त चिन्ह असलेल्या ट्रम्पेट या चिन्हांचे मराठी भाषांतर तुतारी असे करण्यात येऊ नये अशी मागणी शनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगाने पक्षाची ही मागणी मान्य करत ट्रम्पेटचे मराठी भाषांतर न करता ट्रम्पेटहेच ठेवले जाण्याचे आदेश दिले आहेत.

मुक्त चिन्हांच्या नव्या सुधारित यादीत ट्रम्पेटया मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतरण तुतारी न करता ट्रम्पेट असेच ठेवण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा बदल करण्यात आल्याने शरद पवार यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या सुधारीत तक्त्यामध्ये ट्रम्पेट या मुक्त चिन्हाचे मराठी नाव तुतारी ऐवजी ट्रम्पेट असे करण्यात आले आहे.

Whats_app_banner