mumbai pune expressway accident : मुंबई पुणे एक्सप्रेवे वर आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. एक भरधाव खासगी बस ही ट्रकला जाऊन धडकली. या अपघातात ८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर प्रवासी हे किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ट्रकच्या चाकातील हवा कमी झाल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा होता. यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या खासगी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. हा अपघात खोपोली हद्दीत बोरघाट उतराना नव्या बोगद्यामध्ये झाला आहे.
आज सकाळी एक बस ही मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने पुण्याकडे येत होती. दरम्यान, एक ट्रक हा चाकातील हवा कमी झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभा करण्यात आला होता. यावेळी एक बस ही भरधाव वेगात येत होती. या बसवरील चालकाचा ताबा अचानक सुटला. यामुळे ही बस थेट उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली.
बसमध्ये तब्बल ३८ प्रवासी होते. यातील ८ जण गंभीर तर इतर १८ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती समजताच पोलिस आणि मार्गावरील काही प्रवाशांनी तातडीने बचाव कार्य राबवले. रुग्णवाहिकेच्या साह्याने जखमी प्रवाशांना बस मधून बाहेर कडून त्यांना कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे.
मनीषा भोसले, सुनिता तराळ, बालाजी बळीराम सूर्यवंशी (चालक), संकेत सत्तपा घारे (सह चालक), अभिजित दिंडे, सरिता शिंदे, संदीप मोगे, सोनाक्षी कांबळे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांचे नाव आहे. तर सना बडसरिया, शिवांश, तनिष्का, हर्ष, अद्विका, गरिमा पाठक, प्राची, श्रेया, समीक्षा, साक्षी रेपे, मानसी लाड, जोहा अन्सारी, अमित शहा, दीक्षा, चेतन भोपळे, माही, शौर्य, व आदिल हे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातानंतर काही काळ या लेनवरती वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, अपघातातील बस व ट्रक दोन्ही वाहने पुलरच्या सहाय्याने बाजूला घेऊन तिन्ही लेनवरील वाहतूक सद्यस्थितीत सुरळीत चालू करण्यात आलेले आहे.