मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : भरधाव ट्रकची माय लेकीच्या दुचाकीला धडक; अपघातात आईचा मृत्यू

Pune Accident : भरधाव ट्रकची माय लेकीच्या दुचाकीला धडक; अपघातात आईचा मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 09, 2022 05:56 PM IST

Mother died in accident on Pune Solapur road : पुणे सोलपूर मार्गाने दुचाकीवरून जाणाऱ्या माय लेकीच्या दुचकीला ट्रकने धडक दिल्याने मुलीच्या आईचा जागीच मृत्यू झाला.

Road Accident In Pune
Road Accident In Pune (HT_PRINT)

पुणे : पुणे सोलापूर मार्गाने दुचाकीवरून घरी जात असलेल्या माय लेकीच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने आईचा ट्रकखाली आल्याने जागीच मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात आज दुपारी १२ च्या सुमारास हडपसर परिसरात घडला.

वर्षाराणी राहुल बोरावके (वय ३६ रा. गाडीतळ, हडपसर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर मुलगी समृद्धी राहुल बोरावके (वय १५) ही जखमी झाली आहे. या प्रकरणी ट्रकचालक किरण रामकृष्ण सानप (वय २२, रा. वडझरी, ता. पाटोदा, जि. बीड) याला अटक करण्यात आली. राहुल बाेरावके (वय ४४) यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षाराणी आणि त्यांची मुलगी समृद्धी या दुचाकीवरून दुपारी पावणेबाराच्या सुमारास पुणे-सोलापूर मार्गावरील लक्ष्मी काॅलनी परिसरातून जात होत्या. यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. वर्षारानी या खाली पडल्यामुळे त्या ट्रक खाली येऊन गंभीर जखमी झाल्या. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर समृद्धी ही मुलगी जखमी झाली. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले मात्र, वर्षाराणी यांचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी ट्रकचालक किरण सानप याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार तपास करत आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग