भटक्या कुत्रांपासून त्रस्त आहात! 'या' ठिकाणी करा तक्रार, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबात शहरात पालिकेची आहे विशेष सेवा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भटक्या कुत्रांपासून त्रस्त आहात! 'या' ठिकाणी करा तक्रार, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबात शहरात पालिकेची आहे विशेष सेवा

भटक्या कुत्रांपासून त्रस्त आहात! 'या' ठिकाणी करा तक्रार, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबात शहरात पालिकेची आहे विशेष सेवा

Dec 09, 2024 10:48 AM IST

Stray Dogs Issue : राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात काही नागरिकांच्या व लहान मुलांचा मृत्यू देखील झाला आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत तक्रार करण्यासाठी राज्यातील महत्वाच्या पालिकांनी उपाय योजना सुरू केल्या आहेत.

भटक्या कुत्रांपासून त्रस्त आहात! 'या' ठिकाणी करा तक्रार, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबात शहरात पालिकेची आहे विशेष सेवा
भटक्या कुत्रांपासून त्रस्त आहात! 'या' ठिकाणी करा तक्रार, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबात शहरात पालिकेची आहे विशेष सेवा

Stray Dogs Issue : राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात काही नागरिकांच्या व लहान मुलांचा मृत्यू देखील झाला आहे. रात्री ही कुत्री गाड्यांच्या मागे लागून अपघात देखील झाले आहेत. पुणे, मुंबईत तर रोज याच्या असंख्य तक्रारी प्राप्त होत असतात. अनेकांना या बाबत तक्रार कुठे करायची हे नेमकं माहिती नसतं. मात्र, महानगर पालिका, नगर परिषदेत यावर उपाय योजना करण्यासाठी स्वतंत्र विभाग असतो. तर तक्रार करण्यासाठी हेल्प लाइन क्रमांक देखील देण्यात आला आहे. मुंबईत तर भटक्या कुत्र्यांबाबत तक्रार करण्यासाठी ॲप देखील तयार करण्यात आले आहे.

राज्यात भटक्या श्वानांकडून होणाऱ्या उपद्रवाच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भटके श्वान किंवा पाळीव प्राण्यांचे लसीकरण, निर्बीजीकरण यांसह प्राण्यासंदर्भातील तक्रारी नोंदवण्याची सुविधा महानगर पालिकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. या साठी प्राण्यांसाठी काम करणारे विविध शासकीय विभाग किंवा संस्था यांचा देखील या कामासाठी वापर केला जात आहे. मुंबई महानगर पालिकेने यासाठी मायबीएमसी हे मोबाइल ॲप्लिकेशन तयार केले आहे. या सोबतच पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरही तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबई पालिकेच्या ॲपवर अशी करा तक्रार

मुंबई महापालिकेच्या ॲपचा वापर करताना त्यावर सर्वांत आधी तक्रार किंवा विनंती यापैकी एकाची निवड करून तुमची माहिती नोंदवावी लागेल.  त्यानंतर संबंधित विनंती किंवा तक्रारीसाठी एक विशिष्ट क्रमांक तयार होईल व तो नागरिकाच्या थेट मोबाइलवर येईल. या क्रमांकाच्या आधारे नागरिक तक्रार किंवा विनंतीवरील कार्यवाहीबाबतच्या स्थितीचा वेळावेळी आढावा घेऊ शकणार आहेत.

पुणे महानगर पालिकेच्या संकेत स्थळावर हेल्पलाइन क्रमांक

पुण्यात देखील भटक्या कुत्र्यांची समस्या मोठी आहे. भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून अनेक वाद देखील झाले आहेत. पुण्यात भटक्या कुत्र्यांबाबत तक्रार निवारण करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक आहे. हा टोल फ्री क्रमांक आहे. १८००१०३०२२ हा टोल फ्री क्रमांक आहे. तर ९६८९९००००२ या मोबाइल क्रमांकावर व्हॉस्ॲप मेसेज किंवा टेक्स्ट मेसेज करून तक्रार नोंदवू शकतात. या शिवाय क्षेत्रीय कार्यालयानुसार देखील तक्रार दाखल करता येते.

नाशिक महानगर पालिकेत या ठिकाणी करा तक्रार

नाशिकमध्ये देखील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नागरिकांना मदत करण्यासाठी हेल्प लाइन क्रमांक देण्यात आले आहेत. त्यानुसार नागरिकांना ९८२०१२२६०२ या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे तर अॅनिमल हसबंड्री विभागाच्या (९१) ९४२१५११४०० या क्रमांकावर तक्रार दाखल करता येऊ शकते.

औरंगाबादमध्ये या क्रमांकावर करता येऊ शकते तक्रार

औरंगाबाद मध्ये खासगी संस्था लाईफ केअर अॅनिमल वेलफेअर असोसिएशन च्या ८०८७११५५६९, समर्पिता आम्रपाली डॉग रेस्क्यू टीम, पेटा इंडियाच्या ९८२०१२२६०२ या क्रमांकावर तक्रार करता येऊ शकते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर