मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Triple Talak : पत्नीचा छळ करत नवऱ्यानं दिला तिहेरी तलाक; ठाण्यातील धक्कादायक प्रकार, आरोपीवर गुन्हा
Triple Talak Case In Thane
Triple Talak Case In Thane (HT_PRINT)

Triple Talak : पत्नीचा छळ करत नवऱ्यानं दिला तिहेरी तलाक; ठाण्यातील धक्कादायक प्रकार, आरोपीवर गुन्हा

08 March 2023, 19:27 ISTAtik Sikandar Shaikh

Triple Talak Case : घरातील किरकोळ वादातून आरोपीनं आपल्याच पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Triple Talak Case In Thane : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात तिहेरी तलाक कायदा आणि प्रकरणांवरून राजकीय वादंग पेटलेलं असतानाच आता ठाण्यात एका आरोपीनं किरकोळ कारणातून आपल्याच पत्नीला तिहेरी तलाक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्याजवळील भिंवडी शहरात ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापुरात तिहेरी तलाक देण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता भिवंडीतही एका महिलेला तिहेरी तलाक देण्यात आल्याची घटना समोर आल्यामुळं खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील २६ वर्षीय महिलेचं काही महिन्यांपूर्वीच आरोपीसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवसांतच आरोपीनं विवाहित महिलेचा मानसिक आणि शारिरीक छळ सुरू केला. महिलेनं तिच्यासोबत घडत असलेला सारा प्रकार माहेरच्या लोकांना सांगितला होता. परंतु तरीदेखील नवऱ्यानं त्रास देणं काही थांबवलेलं नव्हतं. त्यानंतर पुन्हा घरात वाद झाल्यानंतर नवरा आणि बायकोत कडाक्याचे भांडण झाले, त्यानंतर संतापलेल्या नवऱ्यानं आपल्याच पत्नीला तिहेरी तलाक देत घरी निघून जाण्यास सांगितलं. त्यानंतर महिलेनं तातडीनं या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. पत्नीला तलाक दिल्यानंतर आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. केंद्रातील मोदी सरकारनं तिहेरी तलाक प्रथा बंद करण्यासाठी ऑगस्ट २०२९ मध्ये संसदेत कायदा पारित केला होता. त्यात तिहेरी तलाक देणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचं प्रावधान करण्यात आलं होतं. त्यामुळं आता या प्रकरणातील आरोपीवरही याच कायद्यान्वये कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.