मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldhana Crime : मुले चोरणारी महिला समजून तृतीयपंथीयाला जमावाची मारहाण; पाच जणांना अटक

Buldhana Crime : मुले चोरणारी महिला समजून तृतीयपंथीयाला जमावाची मारहाण; पाच जणांना अटक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 15, 2022 11:43 AM IST

Buldhana Crime : सांगली येथील साधूंना महाणीची घटना ताजी असताना अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदमध्ये घडली आहे. मुळे चोरणारी महिला समजून तृतीयपंथियाला जमावाने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Buldhana Crime
Buldhana Crime

बुलढाणा : सांगली येथे साधूंना मारहाण झाल्याची घटना ताजी असतांनाच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. मुले चोरणारी महिला समजून एका तृतीयपंथियाला जमावाने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी यची दखल घेत मारहाण करणाऱ्या ५ जणांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

सांगली येथील साधूंना मारहाण प्रकरणी तब्बल २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होत. विविध स्थरातून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना मंगळवारी रात्री बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदमध्ये तृतीयपंथियाला ७ ते ८ जणांच्या जमावाने बेदम मारहाण करण्यात आली.

सायरा असे मारहाण झालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. ही व्यक्ति अकोट येथील फॅशन शो बघून मलकापूरकडे घरी परत जात होती. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे जुन्या बस स्टँड परिसरात ती उभी असताना मुले चोरणारी टोळीतील महिला असल्याचा संशय काही नागरिकांना आला. यावेळी कुठलाही विचार तसेच विचारपूस न करता जमावाने या तृतीयपंथियाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या नंतर थेट पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली. त्यात ती निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. यावेळी तृतीयपंथियाने जळगाव जामोद पोलिसात तक्रार देऊन मारहाण करणाऱ्या जमावाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. मारहाणीचा व्हिडिओ देखील काढण्यात आला असून त्या वरुन ५ जणांना अटक करण्यात आली आहे. तिघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. जखमी सायराला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या चर्चा आहे. या परिसरात पालक आणि लहान मुलांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. याच शंकेतून ही घटना झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग