मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  pooja Khedkar Property: प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरआहेत करोडपती; संपत्ती जाणून व्हाल थक्क!

pooja Khedkar Property: प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरआहेत करोडपती; संपत्ती जाणून व्हाल थक्क!

Jul 11, 2024 01:08 PM IST

Pooja Khedkar Salary: पूजा खेडकर यांची एकूण संपत्ती किती आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न किती? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडेकर आहेत करोडपती
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडेकर आहेत करोडपती

pooja Khedkar assets worth: पुणे येथे कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची मंगळवारी मध्य महाराष्ट्रातील वाशीम येथे बदली करण्यात आली. पूजा खेडकर ३० जुलै २०२५ पर्यंत वाशिम येथील प्रशिक्षणाची उर्वरित मुदत पूर्ण करणार आहे. पूजा खेडकर या महाराष्ट्र कॅडरच्या २०२२ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. यूपीएससी परीक्षेत तिने ८४१ चा ऑल इंडिया रँक (एआयआर) मिळवला आहे. अलीकडेच पूजा खेडकर यांनी व्हीआयपी नंबर प्लेट असलेली खासगी ऑडी कार वापरल्याने आणि अधिकाऱ्यांना उपलब्ध नसलेल्या सुविधा त्यांना देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले. याच पार्श्वभूमीवर पूजा खेडेकर यांच्या संपत्तीबाबत माहिती समोर आली.

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सामान्य प्रशासन विभागाला सादर केलेल्या अहवालानुसार, खेडकर यांनी ३ जून रोजी प्रशिक्षणार्थी म्हणून कामावर रुजू होण्यापूर्वीच स्वतंत्र केबिन, कार, निवासी क्वार्टर आणि शिपाई उपलब्ध करून देण्याची वारंवार मागणी केली. मात्र, तिला सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले. खेडकर यांचे वडील निवृत्त प्रशासकीय अधिकारी असून त्यांनी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर दबाव आणला होता, असेही सांगितले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पूजा खेडेकर यांची संपत्ती

पुणे मिररच्या वृत्तानुसार,पूजा खेडकर यांच्याकडे १७ कोटींची मालमत्ता आहे. पूजाचे वडील दिलीप खेडकर आणि आई यांच्या नावावर अनुक्रमे ४० कोटी आणि १५ कोटींची मालमत्ता आहे.आयएएस अधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी पूजा यांच्याकडे १७ कोटींची संपत्ती होती आणि त्यांचे उत्पन्न ४३ लाख रुपये आहे.पूजा यांनी यूपीएससीला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे म्हालुंगे येथे ५.८१ आणि ५.९० गुंठे आहेत. तर, कोंढावा येथे ७२४ चौरस फीट जमीन आहे. याशिवाय, धडवली- ४.७४ हेक्टर जमीन, नांदूर- २.८९ हेक्टर जमीन, पचुंदे- ०.८१ हेक्टर जमीन आणि सरेडी येथे ९८४ चौरस फीट जमीन आहे.

प्रमाणपत्राबाबत प्रश्नचिन्ह

खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट अपंगत्व व इतर मागासप्रवर्गाचे (ओबीसी) प्रमाणपत्र सादर केले. तिने मानसिक आजाराचे प्रमाणपत्रही सादर केले होते, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. एप्रिल 2022 मध्ये तिला तिच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) हजर राहण्यास सांगण्यात आले होते, परंतु कोविड संसर्गाचे कारण देत तिने तसे केले नाही.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर