मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 12, 2024 06:53 AM IST

Pune Hadapsar news : पुण्यात हडपसर येथे साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तसेच मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुण्यात हडपसर येथे साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू
पुण्यात हडपसर येथे साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

Pune Hadapsar news : पुण्यात हडपसर येथे साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तसेच मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रोहित सुभाष मंडाळकर (वय १२, रा. महापालिका शाळेसमोर, डीपी रस्ता, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update:राज्यावर अवकाळीचे संकट! पुणे, नाशिक, नगरसह बहुतांश जिल्ह्यात बरसणार! बाहेर पडतांना काळजी घ्या

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे तर काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान रोहित हा सायंकाळी ७ च्या सुमारास हडपसर येथील डीपी रस्त्याने जात होता. हँडबॉल स्टेडियमसमोर साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरला होता. ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. रोहित रस्त्याने जात असतांना त्याचा पाय हा पाण्यात पडला.

Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी अन् राहुल गांधी एकाच मंचावर येऊन डिबेट करणार? राहुल गांधींनी आव्हान स्वीकारलं

यावेळी त्यांना विजेचा मोठा झटका बसला. हा झटका ऐवढा तीव्र होता की रोहित हा जागेवरच बेशुद्ध पडला. अचानक रोहित खाली पडल्याने नागरिकांनी त्याला तातडीने दवाखान्यात भरती केले. मात्र, उपचार होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती हडपसर पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, रोहितच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. रोहितच्या मृत्युचे नेमके कारण समजू शकले नसल्याने शवविच्छेदनानंतर मृत्यूचे खरे कारण समजेल असे पोलिसांनी सांगितले. पण पोलिसांनी केलेल्या तपासात साचलेल्या पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पाण्यात पडल्याने रोहितच्या नाका तोंडात पाणी गेले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली. 

Lok Sabha Election : चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, इतक्या EVM वर होणार मतदान

  सध्या पुण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. पुढील आणखी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन पुणे वेधशाळेने केले आहे. 

IPL_Entry_Point

विभाग