मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai-Goa Highway traffic : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १८ तासानंतरही बंदच; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai-Goa Highway traffic : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १८ तासानंतरही बंदच; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 23, 2022 10:08 AM IST

Mumbai-Goa Highway traffic diverted : गोवा-मुंबई महामार्गावरील लांजा तालुक्यात आंजणारी पुलावरून टँकर नदीत कोसळला. पुलाचा कठडा तोडून एलपीजीची वाहतूक टँकर नदीत कोसळला. यामुळे तब्बल १८ तासांपासून या मार्गवारील वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. जर तुम्ही या मार्गाने प्रवास करत असाल तर जाऊन घ्या कुठल्या मार्गाने प्रवास कराल.

Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa Highway

रत्नागिरी : गोवा-मुंबई महामार्गावरील (Mumbai goa highway) लांजा तालुक्यात आंजणारी पुलावरून टँकर नदीत कोसळला. पुलाचा कठडा तोडून एलपीजीची वाहतूक टँकर नदीत कोसळला. या टँकरमधून गॅसची गळती होत असल्याने या मार्गावरची वाहतूक ही १८ तासांपासून बंद आहे. गॅस काढण्याचे काम सुरू असून या नंतरच वाहतूक सुरळीत होणार आहे. दरम्यान या मार्गावरील वाहतूक ही वळवण्यात आली आहे. पाली ते लांजा या दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. हा महामार्ग सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी येथील काजळी नदीत टँकर कोसळला. ही घटना गुरुवारी दुपारी २.४५ च्या सुमारास घडली. यात चालकाचा मृत्यू झाला. उंचावरून खाली पडल्याने टँकरमधून एलपीजी गॅसची गळती सुरू झाल्याने काल दुपारपासूनच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबई-गोवा महामार्ग बंद करण्यात आला. या मार्गावरील वाहतूक ही सध्या वळवण्यात आली आहे.

या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून या मार्गावरील वाहूतक लांजा-शिपोशी-दाभोळे-पाली मार्गे रत्नागिरी तसंच देवधे-पूनस-काजारघाटी मार्गे रत्नागिरी या मार्गे वळवण्यात आली आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे. अपघातानंतर तज्ज्ञांची टीम गोवा आणि उरण येथून घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्याकडून अपघातग्रस्त टँकरमधला गॅस सुरक्षितरित्या बाहेर काढला जात असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महामार्गावरील वाहतूक ही दुपार नंतर पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग