Mumbai Goa Highway Traffic Jam : साप्ताहिक सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात कोकणवासी नागरिक गावाकडे जायला निघाले आहे, मात्र, त्यांना मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळ पासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या अनेक किमी रांगा लागल्या आहेत. या कोंडीत अडकल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. पोलिस देखील या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, वाहतुकी कोंडीत भर पडत आहे.
अलिबाग – मुंबई गोवा महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे कोकणात जाणाऱ्या चाकर मान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. हा महामार्ग बऱ्या पैकी सुस्थितीत आणण्यात शासनाला यश आले असले तरी वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका अद्याप झालेली नाही.
काल रात्री पासूनच महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक ही गावाकडे जायला निघाले आहे. यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. प्रामुख्याने आमटेम ते नागोठणे दरम्यान काही अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळच्या सुमारास वाकण फाटा ते सुकेळी खिंड येथे देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या मार्गावरची ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रयत्नांची शिकस्त करीत होते. मात्र, वाहनांच्या मोठ्या रांगा असल्याने पोलिसांची देखील दमछाक झाली. कोकणात जाणारी वाहने दोन्ही लेनवर आल्याने दोन्ही बाजूची वाहने अडकून पडली होती. या मार्गावर ५ ते ६ किलो मिटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. यामुले या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.
या मार्गावर असणाऱ्या माणगाव बाजारपेठ येथे देखील वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडी मुळे महिला आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाल्याचे पाहायला मिळाले. मोठा कालावधी वाहतूक कोंडीत गेल्याने कोकणात सुट्टी घालवण्याच्या आशेने जाणारे प्रवासी त्रस्त झाले होते.