Mumbai traffic change for Anant Ambani wedding : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांचा विवाहसोहळा मुंबईत १२ जुलै रोजी पार पडणार आहे. या विवाहासाठी जगभरातून मान्यवर व्यक्ती येणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबईतील बीकेसी परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढलं आहे. त्यानुसार बीकेसी परिसरातील वाहतुकीत ५ जुलै २०२४ रोजी, म्हणजेच आज सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत आणि १२ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ हे चार दिवस दुपारी १ ते रात्री १२ वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. येथील वाहतूक अन्य मार्गांनी वळवण्यात आली आहे. अर्थात, पोलिसांनी आपल्या पत्रकात अंबानी यांच्या घरच्या विवाह सोहळ्याचा उल्लेख नाही. त्यात केवळ सार्वजनिक कार्यक्रम असं नमूद करण्यात आलं आहे.
लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून धीरूभाई अंबानी स्क्वेअर अव्हेन्यू लेन ३ मार्गे इंडियान ऑइल पेट्रोल पंप, डायमंड जंक्शन, हॉटेल ट्रायडंट तसंच, एमटीएनएल कुर्ल्याच्या दिशेनं जाण्यास (कार्यक्रमास येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना बंदी राहील.
वन बीकेसीकडून येणारी वाहनं लक्ष्मी टॉवर जंक्शन इथून डावीकडं वळून पुढं डायमंड गेट नंबर ८ समोरून नाबार्ड जंक्शन इथून उजवीकडं जाऊन पुढं डायमंड जंक्शन इथून पुन्हा उजवे वळण घेऊन धीरूभाई अंबानी स्क्वेअर / इंडियन ऑइल पेट्रोल पंप इथून पुढं बीकेसी परिसरात मार्गस्थ होतील.
कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटीना जंक्शन, डायमंड जंक्शन व बिकेसी परिसरातील सर्व वाहनांना बिकेसी कनेक्टर ब्रिजव्या दिशेने जाण्याकरीता धिरुभाई अंबानी स्क्वेअर / इंडियन ऑईल पेट्रोलपंप येथून (कार्यक्रमाकरीता येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहील.
कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटीना जंक्शन, डायमंड जंक्शन, नाबार्ड जंक्शन डावे वळण व डायमंड गेट नं. ८ समोरून लक्ष्मीटॉवर जंक्शन येथून उजवे वळण घेवून बिकेसी परिसरात मार्गस्थ होतील.
भारत नगर, वन बीकेसी, दुई वर्क गोदरेज बिकेसीवरून (कार्यकमासाठी येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना जिओ कन्व्हेन्शन सेंटर गेट क्र. २३ इथून जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, अमेरिकन दूतावास, एमटीएनएल जंक्शनच्या दिशेनं जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.
कौटिल्य भवन उजवे वळण-पुढे अॅव्हेन्यू १ रोडने इन्शुरन्स इन्स्टिट्यूट कार्यालय मागील बाजू-अमेरिकी दूतावासाच्या मागील बाजू धिरुभाई अंबानी स्कूल इथून इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.
एमटीएनएल जंक्शन इथून (कार्यक्रमासाठी येणारी वाहनं वगळून) सर्व वाहनांना सिग्नेचर /सनटेक बिल्डींग इथून अमेरिकन दूतावास, जिओ वर्ल्ड कन्वेक्शन सेंटर, बीकेसी कनेक्टर ब्रिजच्या दिशेनं जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.
धीरूभाई अंबानी स्कूल डावे वळण अॅव्हेन्यू १ रोडनं अमेरिकन दूतावासामागील बाजू-इन्शुरन्स इन्स्टिट्यूट कार्यालय मागील बाजू वी वर्क बिल्डींग उजवे वळण- गोदरेज बीकेसी डावे वळण घेवून इच्छित स्थळी मार्गस्थ होतील.
१) लतीका रोड हा अंबानी स्क्वेअर ते लक्ष्मी टॉवर जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी एक दिशा करण्यात येत आहे.
२) अॅव्हेन्यू ३ रोड हा कौटील्य भवन ते अमेरीकन दूतावास जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी एक दिशा करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या