मोहरमनिमित्त आज, १६ जुलै रोजी मुंबईच्या काही भागांतील वाहतूक व्यवस्थेत किरकोळ बदल करण्यात आला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी या संदर्भात ‘एक्स’वरील अधिकृत अकाउंटवर पोस्ट केली आहे.
पोलिसांनी केलेल्या पोस्टनुसार, आज सायंकाळी ४.०० वाजता पी. ईस्माइल मर्चंट चौक (नेसबिट जंक्शन), सोफिया झुबेर जंक्शन, सर जे.जे. जंक्शन, मोहम्मद अली मार्ग व पाकमोडिया स्ट्रीट जैनबिया हॉल या मार्गावर 'शब ए शहादत' मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीमुळं या मार्गावर व परिसरात लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
आज सायंकाळी ५.३० वाजेनंतर वाहनचालाकांनी गैरसोय टाळण्याकरिता जे. जे. पुल वगळून पी डिमेलो मार्ग किंवा एन. एस. मार्गाचा वापर करावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
संबंधित बातम्या