helmet compulsion in state : पुण्यासह राज्यात पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आता दुचाकीचालकासह त्याच्या सहप्रवाशाला देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाढते अपघात व मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल आहे. त्यामुळे आता हेल्मेट नसल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघात वाढले आहेत. या अपघातात दुचाकी चालकासह सहप्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते. पुणे शहरात १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर दरम्यान २७१ अपघात झाले. त्यात २७८ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकी चालकावर कारवाई होत नसल्याचे दिसून आले. हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी याबाबतचा आदेश राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे चालकाबरोबरच आता दुचाकीवरील सहप्रवाशालाही हेल्मेट परिधान करावे लागणार आहे.
'फर्स्ट लेडी' मेलानिया ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये स्वत:साठी हवा वेगळा बेडरूम
आत्तापर्यंत विना हेल्मेट नसलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई केली जात होती. मात्र, आता सहप्रवाशावर देखील करवाई केली जाणार आहे. या बाबत नवे बदल करण्यात आले आहे. पोलिसांच्या ई-चलन मशिनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. विधान सभा निवडणुकीनंतर ही कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. पुण्यात विनाहेल्मेट वाहनचालकांवर सीसीटीव्हीमार्फत कारवाई केली जात आहे. रोज सुमारे चार हजार चालकांवर कारवाई केली जात असून हा दंड दंड भरणाऱ्यांची संख्या मोजकीच आहे.
राज्यात यापूर्वी अनेक वेळा हेल्मट सक्ती करण्यात आली. पुण्यात देखील ही सक्तीने कारवाई करण्यात आली. मात्र, नागरिकांना याला मोठा विरोध केला होता. या विरोधात नागरिक रस्त्यावर देखील आले होते. तर काहींनी हेल्मेट ऐवजी पुणेरी पगडी घालण्यास पसंती दिली होती. मात्र, आता पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी कधीपासून होणार या बाबत स्पष्टता केली नाही.