Mumbai Traffic changes due to swearing-in ceremony : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला आहे. भाजपच्या कोअर कमिटीने देवेंद्र फडवणीस यांच्या नावाची घोषणा केली असून उद्या ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांचा शाही शपथविधी सोहळा हा उद्या आझाद मैदानावर संध्याकाळी ५ वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी वाहतुकीची माहिती घेऊन बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्या गुरुवारी देवेंद्र फडवणीस शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीची शाही तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत एकनाथ शिंदे व अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती असून आणखी २० आमदार शपथ घेणार आहेत.
महायुती सरकारचा शपथविधी सोहळ्यानिमित मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात विविध राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असून त्यामुळे मुंबईतले अनेक महत्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
महापालिका मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वासुदेव बळवंत फडके चौकादरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यासोबतच हजारीमल सोमानी मार्गावरील चाफेकर बंधू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. तयार प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते कोस्टल रोड दरम्यानची दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत वाहतुकीचे नियमन राहणार लागू राहणार आहे. आझाद मैदानात पार्किंगची व्यवस्था नसल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या