Pune Traffic : पुण्यात दगडूशेठ गणपती येथे उद्या पहाटे ५ वाजता अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिवाजी रोड जिजामाता चौक ते रामेश्वर मंदिर चौक हा मार्ग बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी याची दखल घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक उपयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
उद्या रविवारी (दि ८) पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३१ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉ.अरुणा ढेरे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री १० ते १२ वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. या कार्यक्रमासाठी हजारो महिला भाविक सहभागी होणार असल्याने व रस्त्यावर बसून अथर्वशीर्ष पाठणाचा कार्यक्रम करणार आहेत. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शिवाजी रोड जिजामाता चौक ते रामेश्वर मंदिर चौक हा मार्ग बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गाडगीळ पुतळा-जिजामाताचौक डावीकडे वळून गणेश रोडने फडके हौदचौक, देवजीबाबा चौक उजवीकडे वळून हमजेखान चौक सरळ महाराणाप्रताप मार्गावरुन गोविंद हलवाई चौक उजवीकडे वळून गोटीराम भैया चौक डवीकडे वळून शिवाजीरोडने स्वारगेटकडे जावे.
अप्पा बळवंत चौक बाजीराव रोडने फुटका बुरूज मार्गे गाडगीळ पुतळा चौक उजवीकडे वळून जिजामाता चौक नंतर वरीलप्रमाणे, लक्ष्मीरोडवर विजय मारुती चौक / सोन्या मारुती चौकापासून आवश्यकतेनुसार वाहतूक वळविली जाईल. पर्यायी मार्ग सोन्यामारुती चौक डावीकडे वळुन मिर्जा गालीब रोड जंक्शन उजवीकडे वळुन मंडई डावीकडे वळून शिवाजी रोडने स्वारगेट मार्गे जावे.
वाहनचालकांनी वरील प्रमाणे करण्यात आलेल्या वाहतुक बदलांचा अवलंब करून गणेशोत्सव शांततेने पार पाडण्यास व वाहतुक सुरळीत ठेवण्यास पुणे शहर वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे. असे आवाहन वाहतूक शाखेमार्फत करण्यात आले आहे.