Pune Gahunje traffic Update : पुण्यात आज गहूंजे येथील क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान, चौथा टी २० क्रिकेट सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणात पुणेकर क्रिकेट प्रेमी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील होणारी गर्दी लक्षात घेता गहुंजे परिसरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. काही रस्ते बंद तर काही मार्ग वळवण्यात आले आहेत. तसेच व्हीव्हीआयपी / व्हीआयपी / इतर अत्यावश्यक सेवा असा वाहनाचा पास असलेल्या वाहनांना स्टेडियमकडे जाताना द्रुतगती महामार्गाच्या उजव्या बाजूच्या सेवा मार्गाचा पर्याय देण्यात येत आहे.
द्रुतगती मार्गावरून येणारी वाहने किवळे पुलावरून मुकाई चौक येथून यू टर्न घेऊन कृष्णा चौक मार्गे द्रुतगतीमार्गालगतच्या सिम्बॉयसेस कॉलेजच्या बाजुकडील सेवा रस्त्याने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जाणाऱ्या मागाने जातील.
द्रुतगती मार्गाच्या देहूरोड एक्झिटमधून डावीकडे वळावे त्यानंतर तात्काळ परत डावीकडे वळून द्रुतगतीमार्गालगतच्या मामुर्डीगावाच्या बाजूस असलेल्या सेवा रस्त्याने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जावे.
शितलादेवी मंदिर येथून डाव्या बाजूस वळवून लेखा फार्म मार्गे असलेल्या सेवा रस्त्याने स्टेडीयमकडे व पार्किंगकडे जावे.
सेंट्रल चौक मार्गे मुकाई चौकात येणारी वाहने किवळे पुलाखालून कृष्णा हॉटेल शेजारून मामुर्डी अंडरपासच्या डाव्या बाजूने अथवा एमएच ०४ बोगद्यातून डावीकडे वळून कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जातील.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने येणारी वाहने सेंट्रल चौक येथून यु टर्न घेऊन साई नगर फाटा मार्गे पार्किंग ठिकाणी जातील.
जुना मुंबई - पुणे महामार्गाने येणारी वाहने सोमाटणे फाटा, सेंट्रल चौक मार्गे बेंगलोर महामार्गावरील मामुर्डी जकातनाका जवळील अंडरपास व रस्त्याने येणाऱ्या प्रेक्षकाच्या वाहनांना शितलादेवी मंदिर येथून मामुर्डी गावात येण्यास बंदी करण्यात आली आहे. पुणे - बंगलोर महामार्गावरून पवनानदी पूल, हॉटेल सॅन्टोसा पास करून किवळे पुलावरून वाहने डाव्या बाजुकडे वळवायची व २०० मिटरवरून द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूच्या सेवा रस्त्याने स्टेडीयमकडे व पार्किंगकडे जावे लागणार आहे.
निगडी, हँगिंग ब्रिजकडून येणाऱ्या प्रेक्षकांची वाहने रावेत चौक, भोंडवे चौक, मुकाई चौक मार्गे कृष्णा चौक येथून उजव्या बाजूस वळून परत द्रुतगतीमार्गापासून डाव्या बाजूस वळवण्यात आली असून प्रवाशांनी सेवा रस्त्याने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जावे. तर गहुंजे पूल ते वाय जंक्शन मार्गे स्टेडियमकडे फक्त कार पासधारक वाहनांना तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. मामुर्डी गावातील रूहिडा बिर्यानी ते मासुळकर फार्म बाजुकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सामना संपल्यावर मुकाई चौक बसस्टॉप कडून किवळे अंडरपासमार्गे मुंबई तसेच किवळे बाजुकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने मुकाई चौक येथून डावीकडे वळून समीर लॉन्स किवळे गाव मार्गे इच्छित स्थळी जातील.
संबंधित बातम्या