Pune Deccan traffic update : पुण्यात उद्या (दि १२) शुक्रवारी हेरेटेज हँन्डव्हिविंग रिव्हायव्हल चॅरिटेबल ट्रस्टकडून वस्त्रपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर होणार असून यामुळे उद्या सकाळी सकाळी ५ ते १० यावेळेत फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात आला आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त शुक्रवारी सकाळी ५ ते १० यावेळेत डेक्कन जिमखाना परिसरातील गरवारे पूल ते गोखले स्मारक चौक दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामुळे येथे होणारी गर्दी पाहता या मार्गावरील वाहतुकीत सकाळच्या वेळत बदल करण्यात आले आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील वाहतूक ही वळवण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. नागरिकांनी या बदलाची दखल घेऊन सकाळच्या वेळत आपला प्रवास करावा असे आवाहन देखील मगर यांनी केले आहे.
कर्वे रस्त्यावरुन फर्ग्युसन रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी एसएनडीटी महाविद्यालय, आठवले चौक, विधी महाविद्यालय रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा. टिळक चौकातून खंडोजीबाबा चौकाकडे येणाऱ्या वाहनांनी कर्वे रस्ता, प्रभात रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. गोखले स्मारक चौक ते नटराज चौक दरम्यानचा रस्ता कार्यक्रमानिमित्त तात्पुरता दुहेरी करण्यात येणार आहे.
दरम्यान, पुण्यातील साधू वासवानी पूल पाडण्यात येणार असल्याने कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन परिसरातील वाहतूक देखील बदलण्यात आली आहे.
संबंधित बातम्या