स्त्रियांना झाली असून सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यातील १०९ जणांना या विषणूची बाधा झाली आहे. दरम्यान, या विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी महानगर पालिकेतर्फे उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. तापरुग्णांच्या सर्वेक्षणावर पालिकेच्या आरोग्य विभागाने भर दिला आहे.
राज्यात झिका विषाणूची अनेकांना लागण झाली आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्ण असल्याने महानगर पालिका अलर्ट मोडवर असून उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात आता पर्यंत १४० रुग्णांची नोंद झाली असून यातील १०९ रुग्ण एकट्या पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत आढळले आहेत. यानंतर अहिल्यानगर, संगमनेर येथे ११ रुग्ण, पुणे ग्रामीण भागात १० रुग्ण तर पिंपरी-चिंचवड महापालिका ६ रुग्ण आढळले आहे. या सोबतच सांगली, मिरज, कोल्हापूर, सोलापूर, दादर (उत्तर) मुंबईत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.
पुण्यात झिका विषाणूमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व रुग्ण ज्येष्ठ नागरिक होते. तसेच त्यांना अनेक सहव्याधी देखील होता. त्यांचा मृत्यू झिका आणि या विविध अजरांच्या कारणांमुळे झाला असे आरोग्य विभागाच्या मृत्यू परीक्षण समितीने स्पष्ट केलं आहे.
राज्यात तब्बल २ हजार ६८ संशयित झिका रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले आहे. हे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यातील १४० नागरिकांना झिका झाल्याचे निदान झाले आहे. ज्या परिसरात रुग्ण आढळून आले आहेत, त्या परिसरातील ३ ते ५ किलोमीटर परिसरात तापरुग्णांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
पुणे महानगर पालिकेने विविध उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. झिकाचा प्रसार एडीस इजिप्ती डासांमुळे होतो. त्यामुळे कीटकनाशक फवारणीसह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना पालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. यात झिकाचा रुग्ण आढळून आलेल्या परिसरात तापरुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सोबतच गर्भवती महिलांची प्राधान्याने तपासणी करण्यात आली आहे. सर्व तापरुग्णांवर लक्षणाच्या आधारे उपचार करण्यात आले आहे. तसेच गर्भवती महिलांना झिकाच्या धोक्याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आलेय आहे. डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर पालिकेतर्फे भर दिला जात आहे. संशयित रुग्णांची माहिती कळविण्याची खासगी डॉक्टरांना सूचना करण्यात आल्या आहेत. झिकाच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हावे लागत असून या रोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी आहे. नागरिकांना ताप आल्यास घाबरून न जाता त्यांच्यावर उपचार करावेत असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.