मोईसॅनाईट स्टोन, ११ टक्के रिटर्नचे आमिष, ‘या’ प्लॅनच्या माध्यातून हजारो मुंबईकरांना गंडा, Torres Scam ची इनसाईड स्टोरी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोईसॅनाईट स्टोन, ११ टक्के रिटर्नचे आमिष, ‘या’ प्लॅनच्या माध्यातून हजारो मुंबईकरांना गंडा, Torres Scam ची इनसाईड स्टोरी

मोईसॅनाईट स्टोन, ११ टक्के रिटर्नचे आमिष, ‘या’ प्लॅनच्या माध्यातून हजारो मुंबईकरांना गंडा, Torres Scam ची इनसाईड स्टोरी

Jan 07, 2025 09:19 PM IST

Torres Company Fraud : कंपनी गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्या सुरक्षेसाठी त्यांना एक हिरा देत असे. त्यांना सांगितले जात असे की, या हिऱ्याची किंमत त्यांनी गुंतवलेल्या पैशाइतकीच आहे. मात्र एका ग्राहकाला दिलेला हिराही खोटा आढळला आहे.

टोरेस कंपनी फसवणूक
टोरेस कंपनी फसवणूक

Torres Company Scam Update : मीरा-भाईंदरमध्ये इन्वेस्टमेंट स्कीममध्ये हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा फटका बसल्याचे प्रकरण समोर आले आहे. टोरेस कंपनीवर आरोप केला जात आहे की, त्याचा मालक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पसार झाला आहे. सोमवारी कंपनीचे मीरा-भाईंदर आउटलेट अचानक बंद झाले अन् कार्यालयाच्या बाहेर गुंतवणूकदारांच्या रांगा लागल्या. याबाबत कंपनीच्या कोणत्याही अधिकृत प्रतिनिधीशी संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान कंपनी संबंधित एका महिलेने सांगितले की, कंपनीच्या वेबसाइटमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लोकांना रिटर्न्स देण्यात अडचणी येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये रजिस्टर्ड'प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड'कंपनीने२०२४ मध्ये'टोरेस'ब्रँडच्या माध्यमातून दादरमध्ये ३०हजार वर्गफुटाचे आउटलेट उघडले होते. त्यानंतर कंपनीने मीरा-भाईंदरसह अनेक ठिकाणी आउटलेट सुरू केले.

कंपनीने दिली मोठी आश्वासने -

कंपनी सोने,चांदी आणि मोयसॅनाइट स्टोन (कृत्रिम हीरे) खरेदीवर तितक्याच रक्कमेवर क्रमशः ४८,९६ आणि ५२ वार्षिक रिटर्न्सचे आमिष दाखवत होती. रिटर्न्स दर आठवड्य़ाला दिला जात होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून हफ्ते न आल्याने गुंतवणूकदारात संभ्रमाचे वातावरण आहे.

कृत्रिम हिरे खरेदीवर जोर -

कंपनी गुतंवणूकदारांना सोने,चांदी पेक्षा कृत्रिम हिरे खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. यावर सर्वाधिक रिटर्नही दिला जात होता, जो आठवड्याला ८ ते ११ टक्के पर्यंत होता. कंपनीच्या वेबसाइटनुसारप्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेडचे रजिस्टर्ड ऑफिस गिरगावमधील ओपेरा हाउस इमारतीमध्ये आहे. कंपनीत इम्रान जावेद,सर्वेश सुर्वे आणि ओलेना स्टायएन तीन गुंतवणूकदार आहेत. त्यांनी आपला पत्ता कंपनीचा पत्ताच दाखवला आहे.

कंपनी गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्या सुरक्षेसाठी त्यांना एक हिरा देत असे. त्यांना सांगितले जात असे की, या हिऱ्याची किंमत त्यांनी गुंतवलेल्या पैशाइतकीच आहे. मात्र एका ग्राहकाला दिलेला हिराही खोटा असल्याचे आढळले आहे. या हिऱ्याची बाजारभाव किंमत केवळ ५०० रुपये इतकीच आहे. या कंपनीत  लाखापासून जास्तीत जास्त ५० लाखापर्यंत गुंतवणूक केली आहे.

गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चूना लावल्याची शक्यता -

वकील तरुण शर्मा यांनी सांगितले की, या योजनेबाबत कोणीतरी काही आठवड्याआधीच पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या ओळखीच्या अनेक लोकांनी कंपनीत लाखोंची गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर मोहम्मद आलम यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मित्राच्या सांगण्यावरून ६ लाख रुपये गुंतवले होते. त्यांच्या मित्रानेही ९ लाख रुपये कंपनीत गुंतवले होते. त्यांना प्रत्येक आठवड्याला ४८हजार रुपये देण्याचे आश्वास दिले होते. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून त्यांना हफ्ता मिळाला नाही.

कंपनीच्या मालकाचे दुबईला पलायन?

एका रात्रीत कंपनी बंद पडल्याचे वृत मुंबईत पसरताच शेकडो गुंतवणूकदार कार्यालयाच्या बाहेर जमा झाले. तनावाची परिस्थिती पाहून पोलीस व गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा तपास केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीचा मालक दुबईत आहे. त्याने पूर्ण नियोजन करून परदेशात पलायन केले आहे. त्यानंतर कंपनीचे शटर रातोरात बंद करण्यात आले.

तळोजा येथे राहणारे गुंतवणूकदार जमीर शेख यांनी सांगितले की, टोरेस कंपनीत गुंतवणूक केल्यास दुप्पट परताव्याचे आमिष दाखवले होते. कंपनीच्या सेमिनारमध्ये सहभागी होऊन त्यांच्या कुटूंबाने सोने-चांदीचे दागिने गहाण ठेऊन कंपनीत पैसे गुंतवले होते. सुरुवातीला दर आठवड्याला रिटर्न मिळत राहिले मात्र डिसेंबर महिन्यात दोन हफ्ते जमा झाल्यानंतर रिटर्न मिळणे बंद धाले. राहुल गुप्ता यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यापासून ग्राहकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. एकमेकांशी संपर्क केल्यावर समजले की, कंपनीचे सर्व लोक फरार असून त्यांचे फोन नंबरही बंद आहेत.

कंपनीचे खाते गोठवले -

मुंबईतील या स्कॅमची माहिती मिळताच मिरा भाईंदर पोलिसांनी सतर्कता दाखवून कंपनीचे खाते गोठवले आहे. त्यामुळे नागरिकांचे १ कोटी ७७ लाख रुपये वाचल्याचे सांगितले जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर