Pandharpur Wari 2024: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोल माफी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pandharpur Wari 2024: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोल माफी

Pandharpur Wari 2024: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोल माफी

Updated Jul 03, 2024 03:59 PM IST

Pandharpur Wari 2024: पंढरपूरला आषाढीनिमित्त जाणाऱ्या व परत येणाऱ्या पालख्या आणि वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी परिवहन विभागातून आवश्यक स्टीकर्स दिले जाणार आहेत.

आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोल माफी
आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोल माफी

Pandharpur Wari 2024: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीसाठी राज्यभरातून पायी दिंड्या निघाल्या आहेत.टाळ-मृदुंगाचा गजरात व हरीनामाचा जप करत वारकरी पंढरपूरकडे निघाल्या आहेत. त्यात आता सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठीखुशखबर आहे.आषाढीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना वभाविकांच्यावाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.सरकारकडून टोलमाफीचाजीआरही काढण्यात आला आहे.

पंढरीला जाण्यासाठी एसटी महामंडळाकडूनही पाच हजार अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पंढरपूरकडे जाणाऱ्या खासगी वाहनांचीही संख्या मोठी असते. पंढरीला जाणाऱ्या वारकरी व भाविकांसाठीराज्य सरकारनेमोठा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी देण्यात आली आहे. आजपासून (३ जूलै) ते २१जुलैपर्यंत ही टोलमाफी असणार आहे.

गेल्यावर्षी सरकारने कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूरला आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता.सरकारने गतवर्षी वारीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी दिली होती. यावर्षीही राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. ३ जूलैपासून पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

पंढरपूरला आषाढीनिमित्त जाणाऱ्या व परत येणाऱ्या पालख्या आणि वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी परिवहन विभागातून आवश्यक स्टीकर्स दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे ३ जुलै ते २१ जुलै दरम्यान पंढरपूरला जाणाऱ्या आणि पंढरपूरहून गावी जाणाऱ्या सर्वच वाहनांना पथ करातून सूट मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या बसेसनाही टोलमाफी देण्यात आली आहे. तशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

सरकारकडून दूध उत्पादन शेतकऱ्यांना मोठा दिलासा -

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. दूध उत्पादन शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये तर शासनाकडून ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात ही घोषणा केली. नवे दर १ जुलै पासून राज्यभर लागू केले जातील, असे स्पष्ट करत दुध भुकटीसाठी प्रति किलो ३० रूपये अनुदान देणार असल्याची घोषणाही विखे यांनी केली आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर